देशात 1 लाख 41 हजार नवे कोरोना रुग्ण; 285 रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 test swab
देशात 1 लाख 41 हजार नवे कोरोना रुग्ण; 285 रुग्णांचा मृत्यू

देशात 1 लाख 41 हजार नवे कोरोना रुग्ण; 285 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णसंख्येत (Covid19 Cases) सातत्यानं वाढ होत असून, रुग्णांमध्ये काही तीव्र लक्षणं देखील आढळून येत आहेत. कोरोनासोबतच ओमिक्रॉनच्या (Omicron Cases) रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आज समोर आलेल्या आकडेवारीमध्येही मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. मागच्या 24 तासांत देशात 1,41,986 रुग्णांची (New Cases of Covid19) नोंद झाली आहे. 4,72,169 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे आता बाधित होण्याचा दर 9.28% वर पोहोचला आहे.

हेही वाचा: लसनिर्मितीसाठी हाफकिन बायोफार्माला मान्यता

कोरोनामुळे काल दिवसभरात 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकुण मृत्यूचा आकडा आता 4,83,178 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 3,44,12,740 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जगाचा विचार केल्यास जगभरात गेल्या चोवीस तासात २५ लाख जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉन संसर्गाकडे दुर्लक्ष नको; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होणाऱ्या वाढीसह ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढते आहे. जगभरात गेल्या चोवीस तासात २५ लाख जणांना कोरोनाची लागण झालेली असताना जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस ट्रेडोस घेब्रेयेसस यांनी ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा दिला आहे. ओमिक्रॉन हा लस घेतलेल्या नागरिकांना डेल्टाच्या तुलनेत कमी धोकादायक ठरत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मागील व्हेरिएंटप्रमाणेच ओमिक्रॉनमुळेही नागरिकही मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत आहेत आणि काहींचा जीव जात असल्याचेही ट्रेडोस घ्रेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronaviruscovid19
loading image
go to top