पावसाळी पर्यटन स्थळांवर जाऊ नका : जिल्हाधिकारी राऊत

Collector Abhijit Raut latest marathi news
Collector Abhijit Raut latest marathi newsesakal

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दमदार पाऊस (Heavy rain) झाला आहे. आगामी काळातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. केव्हाही अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, पावसाळी पर्यटन स्थळांवर पाणी धोक्याची पातळी ओलांडू शकते.

यामुळे नागरिकांनी आगामी काही दिवस काम असेल तरच घराबाहेर पडावे. धरणे, तलाव, मोठ्या नद्यांचे पाणी पाहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector abhijit raut) यांनी मंगळवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत केले. (Jalgaon district Collector Abhijit Raut statement about monsoon tourism jalgaon Latest Marathi news)

सुकी धरणावर (ता. रावेर) सोमवारी (ता. १८) पर्यटनासाठी गेलेल्या व पुरात अडकलेल्या ९ पर्यटकांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढले. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणात प्रचंड पाणीसाठा असल्याने धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. धरणातील पाण्याची पातळी वाढली, की नदीपात्रात केव्हाही पाणी सोडले जाते. यामुळे धरणे, नद्यांचा पुलावर जाणे टाळावे, नद्यात पोहणे टाळावे.

अन्यथा सुकी धरणाची घटनेची पुर्नरावृत्ती होवू शकते. ती घडू नये, यासाठी सर्वच पावसाळी पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मात्र नागरिकांनी स्वतःहून जीव धोक्यात घालू नये.
पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते उपस्थित होते.

Collector Abhijit Raut latest marathi news
मतदार याद्या आधारशी जोडणार; निर्दोष मतदारयाद्यांसाठी आयोगाचा उपक्रम

हरित’ जळगाव संकल्पना

जिल्ह्यात तापमान, थंडी अधिक असते. तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे.

राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के नेण्यासाठी ‘हरीत महाराष्ट्र’ महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी २०२२-२३ आर्थिक वर्षांत ‘हरीत जळगाव’ ही
संकल्पना जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे.

वेबसाईटवर नोंदणी करावी

वृक्ष लागवडीसाठी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, शासकीय विभाग यांच्याकडे वृक्ष लागवडीसाठी योग्य असलेल्या जागा शोधून त्यावर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावयाची आहे. ग्रामपंचायतीचा वित्त आयोग, ग्रामपंचायत फंड, मनरेगा, महापालिका, नगरपालिकेचा फंडातून ही वृक्ष लागवड करण्यात येईल.

यासोबत सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, नागरिक वैयक्तिकरित्या वृक्ष लागवड करून या संकल्पनेत सहभागी होवू शकतील. या योजनेत आतापर्यत एक लाख ४० हजार झाडे लावण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या ‘जळगाव डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाईटवर नोंदणी करता येईल.

Collector Abhijit Raut latest marathi news
काझी गढीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादरच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com