पाणीटंचाई योजनांचा फेर आढावा घ्या : जिल्हाधिकारी राऊत

Collector Abhijit Raut
Collector Abhijit Rautesakal

जळगाव : जुलै महिन्याच्या गत दहा दिवसात ४३ टक्के पाऊस (Rain) झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये वरुणराजाची समाधानकारक हजेरी असली तरी जिल्ह्यात ११ गावांमध्ये ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा अद्याप सुरूच आहे. दरम्यान टंचाईच्या उपाययोजनांचा फेर आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी सोमवारी (ता. ११) झालेल्या बैठकीत दिले. (jalgaon district Collector Abhijit Raut Statement about water scarcity scheme Jalgaon Latest Marathi news)

जिल्ह्यातील पाणीपुरवठा टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह टंचाई विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Collector Abhijit Raut
Jalgaon : 2 हजारांवर रेल्वेचे जनरल तिकीट UTS APP डाउनलोड

अशी आहे टंचाईची सद्य:स्थिती

जिल्ह्यात ५०५ गावांसाठी उपाययोजनांचा ३ कोटी ११ लाखांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. यात सद्य:स्थितीला चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, हातगाव भिल्ल वस्ती, वाघळी, तमगव्हाण, विसापूर तांडा, हातगाव, अंधारी, भुसावल तालुक्यातील मौजे कंडारी, महादेवमाळ आणि पारोळा तालुक्यातील खेडी ढोक, हनुमंतखेडे अशा ११ गावांमध्ये ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तसेच ८२ गावांमधील ८४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर २१ गावांमध्ये २४ नविन विंधन विहीर घेण्यात आल्या आहेत. आठ गावांमध्ये ११ नविन कूपनलिका तयार करण्यात आल्या आहे. योजनांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यात जून महिन्यात फारसा पाऊस झाला नसला तरी जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत ४३ टक्के पाऊस झाला असल्याने जिल्ह्यात ज्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू आहेत, त्यांचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या.

Collector Abhijit Raut
Jalgaon : कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची केली सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com