esakal | जळगाव : नगरपालिकांमध्ये प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास वेग
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District

जळगाव : नगरपालिकांमध्ये प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास वेग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव - जिल्ह्यात डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२मध्ये मुदत संपणार्‍या नगरपालिकांच्या निवडणुकीचे दृष्टीने तयारीला सुरुवात झाली आहे. यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगातर्फे सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तयानूसार प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास १६ नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये वेग आला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या ६ ऑगस्टच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील जामनेर, शेंदुर्णी, मुक्ताईनगरचा अपवाद वगळता अन्य सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. यात प्राथमिक स्तरावर भडगाव व वरणगाव नगरपरिषदेची मुदत दिड वर्षापूर्वी मार्च २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे प्राधान्याने भडगाव व वरणगांव नगरपालिकांच्या निवडणूका होउन त्यानंतर भुसावळ, यावल, चोपडा, सावदा, फैजपूर, रावेर, बोदवड, पारोळा, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव तसेच नव्याने जाहीर करण्यात आलेल्या नशिराबाद नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणावरुन जळगावात भाजप मोर्चा आक्रमक

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे भडगाव व वरणगाव नगरपरिषद, पंचायतींच्या निवडणूकां पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत संसर्ग प्रादूर्भाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहकार विभागातर्फे जिल्हा बँक व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहकार विभागाकडून जिल्हा बँकेची मतदार यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी केली जाणार आहे. बहुसदस्यिय ऐवजी एक सदस्यीय पद्धती अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत. त्यानुसार देखिल मुदत संपुष्टात आलेल्या व येत असलेल्या नगरपरिषद, पंचायतींच्या निवडणूकांसंदर्भात संबधीत जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांना प्रभाग वार्ड रचना व आरक्षण मतदार यादी प्रसिद्धी सदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.

loading image
go to top