esakal | ओबीसी आरक्षणावरुन जळगावात भाजप मोर्चा आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

ओबीसी आरक्षणावरुन जळगावात भाजप मोर्चा आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाजळगाव : ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरून राज्यातील आघाडी सरकारविरोधात ( Government) भाजपने (BJP) राज्यात तिव्र आंदोलन छेडलेले आहे. त्यानुसार जळगाव शहरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आला. यावेळी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेल्याची तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त करत घोषणाबाजी केली.

Against the government

हेही वाचा: अभियंता दिन विशेष:दोन दशकांपूर्वी ठरले‘मेक इन इंडिया’चे पायोनिअर

भाजप ओबीसी मोर्चा जळगाव महानगर आणि जिल्हा ग्रामीण तर्फे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सरकार विरोधात घोषणाबाजी

आंदोलनात भाजप मोर्यातर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी आरक्षण सरकारमूळे गेले असल्याचा आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला.

हेही वाचा: दारू विक्रेत्यांशी वाद..रेल्वेखाली झोकून तरुणाची आत्महत्त्या

आंदोलनात हे होते सहभागी..
या वेळी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष रेखा पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top