Jalgaon Crime New : बहादरपूर, शिरसोदेत चोरट्यांचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theft

Jalgaon Crime New : बहादरपूर, शिरसोदेत चोरट्यांचा धुमाकूळ

पारोळा : तालुक्यातील बहादरपूर, शिरसोदे येथे एकाच रात्री सात ठिकाणी चोरी झाल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. एका रात्री सात ठिकाणी चोरी होण्याची ही तालुक्यात पहिलीच घटना असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

हेही वाचा: Sand Smuggling : अरेच्चा! अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी चक्क रस्त्यात खोदले खड्डे

रात्री अडीच-साडेतीनच्या दरम्यान काही संशयितांनी बहादरपूर येथे रात्री प्रवेश केला. त्यानंतर शिरसोद्यात मोर्चा वळविला. अशी एकापाठोपाठ सात घरे फोडली. थंडी जास्त असल्याने कोणीही बाहेर झोपले नव्हते. हीच संधी साधून चोरांनी डल्ला मारला. यात बहादरपूर येथील तीन आणि शिरसोद्यातील चार घरे त्यांनी फोडली आहेत. यामध्ये बहादरपूर येथील माजी सरपंच भिकन चौधरी, उपसरपंच राजेंद्र माकडे, डॉ. विशाल बडगुजर तर शिरसोद्यातील माजी ग्रामपंचायत सदस्य जयकुमार पाटील, बडगुजर, दुकानदार मुसळे आणि मालचे यांच्या घरातून चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी बंद घरांनाच लक्ष्य केले आहे.

कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घर बंद असलेल्यांचीच घरे टार्गेट झाल्याने संशयाचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तत्काळ जळगावला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्‍वानपथकाने रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला. या वेळी डॉ. विशाल बडगुजर यांच्या दवाखान्याचे कडी-कोयंडा तोडून, हरिश्चंद्र मुसळे यांचे किराणा दुकान, राजेंद्र वाणी, निवृत्त शिक्षक जयकुमार पाटील, सुरेश मालचे सुनील चौधरी यांचे बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी रोकडसह दागिने लंपास केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी हरिचंद्र मुसळे (बहादरपूर) यांनी पारोळा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: Body Detoxification : बॉडी डिटॉक्स करणं म्हणजे काय? जाणून घ्या याचं महत्व

संशयित सीसीटीव्हीत कैद

एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा गुन्हेगार कैद झाले असून, दोन मोटारसायकलींवर एकूण सहा जण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. एफ झेड आणि केटीएम गाड्या त्यांच्याजवळ असून एकूण सहा जणांचा या चोरीत समावेश असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. दरम्यान, या चोरीप्रकरणी कसून चौकशी करा आणि चोरांना पकडा, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्याकडे केली.

टॅग्स :JalgaonCrime Newsthief