जळगाव जिल्ह्यातील ९६ रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

चार टक्के बाधितांत सौम्य लक्षणे; गंभीर रुग्णही नाहीत
omicron patient
omicron patientsakal

जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Covid Third Wave) संसर्गदर अधिक असल्याने झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आठवडाभरात जळगाव जिल्ह्यातील(jalgaon district) रुग्णांची संख्या दहावरून आठशेवर गेली. मात्र, या हजारांहून अधिक रुग्णांपैकी जवळपास ९६ टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत, ज्या चार टक्के बाधितांमध्ये लक्षणे दिसून येताय, ती अगदीच सौम्य आहेत. विशेष म्हणजे या बाधितांमध्ये गंभीर रुग्ण बोटावर मोजण्याइतकेही नाहीत.(Corona Patient)

omicron patient
शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट देशात तिसरी लाट घेऊन आला. डिसेंबरअखेर राज्यातही तिसऱ्या लाटेला सुरवात झाली. जळगाव जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या, दुसऱ्या दिवसापासून रुग्णसंख्या वाढू लागली. डिसेंबरअखेर अवघे चार-पाच सक्रिय रुग्ण असलेल्या जळगाव जिल्ह्यात दहा- बारा दिवसांतच सक्रिय रुग्णसंख्या आठशेवर पोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे आदेश काढत कोरोनासंबंधी निर्बंधांच्या अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.

omicron patient
कोविड रुग्णसंख्या उतरणीला

९६ टक्के रुग्ण लक्षणेविरहित

वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र, या लाटेत जे रुग्ण बाधित होत आहेत, त्यांच्यात अगदीच सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. विशेष म्हणजे जवळपास ९६ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, तर केवळ चार टक्के रुग्णांमध्येच लक्षणे असून तीदेखील सौम्य स्वरुपाची आहेत. शासनाने बाधितांसाठी विलगीकरणाचा प्रोटोकॉल बदलून तो सात दिवसांचाच केला असून, त्यामुळेही या वेळच्या लाटेतील संसर्ग खूप गंभीर नाही, असे दिसून येते.

गंभीर रुग्ण नाहीत

जिल्ह्यात सद्य:स्थितीत जे सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी कुणीही खूप गंभीर, आयसीयूत अथवा व्हेंटिलेटरवर नाही. केवळ सहा रुग्ण तेवढे ऑक्सिजनवर आहेत. विशेष म्हणजे लक्षणे नसलेले सर्वच ९६ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

तिसरी लाट सुरू झाल्यानंतर बारा दिवसांत मंगळवारी पहिल्या मृत्यची नोंद झाली. मात्र, मृत्यू झालेली ही ४२ वर्षीय व्यक्ती कोमॉर्बिड म्हणजे सहव्याधीने बाधित होती, शिवाय त्याने कोविड प्रतिबंधक लशीचा एकच डोस घेतला होता.

omicron patient
शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

सध्या ऑक्सिजनची गरज नाही

सध्या दोन-चार रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासत आहे. कोविड काळात सुरू झालेल्या खासगी रुग्णालयांमध्ये सध्या रुग्ण नाहीत, असे असले तरी खासगी रुग्णालयांची यंत्रणाही ऑक्सिजन बेड, बायपेप, व्हेंटिलेटर यांसह सज्ज आहे.

अशी आहे स्थिती

  • एकूण सक्रिय रुग्ण १०३२

  • लक्षणे नसलेले १००७

  • लक्षणे असलेले २५

ऑक्सिजनवरील रुग्ण ०६

पहिल्या व दुसऱ्या लाटेतील संसर्गापेक्षा सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेतील संसर्ग तुलनेने सौम्य स्वरूपाचा आहे. अद्याप गंभीर रुग्ण समोर आलेले नाहीत. मात्र, सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे.

- डॉ. राहुल महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com