Election 2022 : जिल्हा दूध संघ निवडणूकीचा सुरू झालायं ‘माईंड गेम’

Voting
Votingesakal

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या संचालकपदासाठी शुक्रवारी (ता. ९) मतदान होणार आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या ‘सहकार’ व मंत्री महाजन यांच्या ‘शेतकरी’ पॅनलतर्फे आरोप प्रत्यारोपांचा माईंड गेमही सुरू झाला आहे. याशिवाय मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर अद्यापही भर देणे सुरूच आहे.

दोन्ही गटांनी आता विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दूध संघाच्या कामकाजाबाबत दोन्ही गटांतर्फे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ खडसे व आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही गटांतर्फे सुरू आहे. मतदारांची संख्या केवळ ४४१ असून, उमेदवारांतर्फे त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे सुरूच आहे. शिवाय त्यांना भ्रमणध्वनीवरून अवाहन करण्यात येत आहे. मतदारांच्या नातेवाइकांना भेटून आपल्याकडे लक्ष देण्याचे अवाहनही करण्यात येत आहे.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

Voting
Jalgaon Politics : एकनाथ खडसेंना जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही : आमदार मंगेश चव्हाण

मतदान केंद्राची तयारी
जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या मतदानासाठी प्रशासनानेही तयारी केली आहे. जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रे कंसात मतदारसंख्या व ठिकाण अशी : अमळनेर (मतदार ७८) कृषी बाजार समिती आवार, भुसावळ (४४) म्युनिसिपल हायस्कल जामनेर रोड, चाळीसगाव (मतदार ५८) हिरूभाई हिमाभाई पटेल विद्यालय, एरंडोल (मतदार ६७) सूयोदय ज्येष्ठ नागरिक संस्था दत्त कॉलनी, फैजपूर (मतदार ६१) म्युनिसिपल हायस्कूल छत्री चौक, जळगाव (५७)-श्री सत्यवल्लभ हॉल, संगम सोसायटी रिंग रोड, पाचोरा (मतदार ७६) श्री गो. से. हायस्कूल.

Voting
Jalgaon District Milk Union Election : दूध संघ वाचविणे हेच आमचे ध्येय : गुलाबराव पाटील

पालकमंत्री पाटील दिल्लीत
पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव तालुक्यातून दूध संघाचे उमेदवार आहेत. मात्र, ते गुरुवारी दिलली येथे रवाना झाले आहेत. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या विवाह सोहळ्यासाठी ते गेले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते दिल्लीहून परतणार आहेत. याबाबत माहिती त्यांनीच दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com