Latest Marathi News | कामाच्या विश्‍वासावर ‘मविआ’ ला यश मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Milk Union election

Jalgaon District Milk Union Election : कामाच्या विश्‍वासावर ‘मविआ’ ला यश मिळणार

जळगाव : जिल्हा दूध संघात गेली सात वर्षे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संचालकांनी कार्य करून दूध उत्पादकांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्याच विश्‍वासाच्या बळावर महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, की दूध संघ डबघाईस गेला होता. त्याला उर्जितावस्था आणण्याचे काम गेल्या सात वर्षांत झाले आहे. संघात अत्याधुनिक मशीनरी आली आहे. दूध उत्पादकांचा विश्‍वास संपादन झाल्यामुळे आज लाखो लिटर्स दूध संकलीत होत आहे. त्यामुळे दूध संघात जे काम गेल्या सात वर्षांत झाले आहे, ते आज जनतेसमोर आहे.(Jalgaon District Milk Union Election MVA government get success on faith of work Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Innovation Story : गुरू-शिष्येच्या सायबर सुरक्षा संशोधनाला पेटंट

निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आरोप करीत आहेत, ते त्यांना सिद्ध करावे लागणार आहे. गेली सात वर्षे आरोप करणारे विरोधक झोपले होते का? त्यामुळे जनता सर्व ओळखून आहे. त्यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी होईलच.

जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र, आज जनमाणसात गेल्या सात वर्षांतील दूध संघाच्या कार्यामुळे एक चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याच बळावर आम्ही महाविकास आघाडीच्या पॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आहोत.

याशिवाय विरोधकांच्या द्वेषाच्या राजकारणाला आता जनता कंटाळली आहे. जनतेला आज विकास हवा आहे. जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही चांगले काम करून दूध संघावरचा शेतकरी व जनतेचा विश्‍वास कायम राखू.

हेही वाचा: Jalgaon : गीता धर्मग्रंथ नव्हे, मानवी जीवनाचे नियमन करणारा ग्रंथ