corona victims | जळगाव जिल्ह्यात नव्या बाधितांचा उद्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

COVID-19 third wave
जळगाव जिल्ह्यात नव्या बाधितांचा उद्रेक

जळगाव जिल्ह्यात नव्या बाधितांचा उद्रेक

जळगाव, ता. १५ : जिल्ह्यात शनिवारी (ता. १५) पुन्हा तब्बल ३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर ४६ रुग्ण कोरोनामुक्त(Corona free) झालेत. त्यामुळे आता सक्रिय रुग्णांची संख्या १८४६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट (COVID-19 third wave) दररोज वाढती रुग्णसंख्या घेऊन आली आहे. शनिवारी प्राप्त १६४७ पैकी ३७७ अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा: पाकच्या सुरक्षा धोरणाकडे दुर्लक्ष नको

जिल्ह्यात १८४६ रुग्ण सक्रिय असून त्यापैकी आता ९५ रुग्ण लक्षणे असलेले आहेत, तर ११ रुग्ण सध्या ऑक्सिजन वर आहेत. उर्वरित १७५१ रुग्ण लक्षणे विरहित आहेत.

जळगाव, भुसावळात उद्रेक सुरूच जिल्ह्यात जळगाव शहर, भुसावळ हॉटस्पॉट ठरत आहे. आजही या दोन्ही ठिकाणी शंभरावर रुग्ण सापडले. जळगावात १५५, भुसावळ तालुक्यात १४४ नव्या बाधितांची नोंद झाली.

हेही वाचा: एकतर्फी बदल अमान्य : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

असे आढळले रुग्ण

जळगाव ग्रामीण ९, अमळनेर १३, चोपडा १५, भड़गाव ७, यावल व जामनेर प्रत्येकी २, एरंडोल व रावेर प्रत्येकी ३, चाळीसगांव २०, पाचोरा, पारोळा व धरणगाव प्रत्येकी १.

Web Title: Jalgaon District New Victims Outbreak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..