Jalgaon News: वार्षिक योजनेत अनु. जाती उपयोजना निधी खर्चात जळगाव राज्यात प्रथम

fund
fundsakal

Jalgaon News : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत २०२३-२४ साठी अर्थसंकल्पीय निधी ९२ कोटी रुपये निधीमधून ४६ कोटी एक लाख रुपये निधी बीडीएसवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यापैकी सोमवार (ता. ६)पर्यंत ३५ कोटी ९६ लाख ८६ हजार निधी बीडीएसवर खर्च झाला. (Jalgaon district ranks first in state in expenditure of Scheduled Castes Sub Plan funds in annual plan news)

उपलब्ध निधीशी खर्च झालेल्या निधीची टक्केवारी ७८.१८ टक्के तसेच अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची टक्केवारी ३९.१० टक्के असून, निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे निधी खर्चात जिल्हा राज्यात प्रथम आहे‌.

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करण्यासाठी नियोजन समितीने १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२३ असा १०० दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखला.

fund
Jalgaon News: शेतकऱ्याने काढली केळीने भरलेल्या वाहनाची मिरवणूक! मिळाला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव

या कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश व निधी प्राप्त करून खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी वेळोवेळी दिल्या होत्या. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात गतिमानता आली.

प्राप्त निधी व अर्थसंकल्पीत निधीचे खर्चाच्या टक्केवारीच्या रॅंकमध्ये जळगाव राज्यात प्रथम आहे. त्या खालोखाल अनुक्रमे गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक विभागातील धुळे जिल्हा १३ वा क्रमांक , नंदुरबार १७ वा, नाशिक २५ वा तसेच अहमदनगर २९ व्या क्रमांकावर आहे. निधी वितरित कामांचे कार्यारंभ आदेश काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. कार्यान्वयन यंत्रणांनी वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या आहेत.

fund
Jalgaon Bus News: जळगाव-पुणे विमानापेक्षा लक्झरी बसचे भाडे अधिक! खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून प्रवासी वेठीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com