Jalgaon Drought News : गिरणा पट्टा दुष्काळाच्या दाहकतेने होरपळतोय; खरिपावर नांगर फिरला अन् रब्बीची आशा मावळली

Jalgaon Drought : अत्यल्प पावसामुळे खरिपावर नांगर फिरला अन् रब्बीचीही त्याहून वेगळी परिस्थिती नाही.
drought
droughtesakal

Jalgaon Drought News : अत्यल्प पावसामुळे खरिपावर नांगर फिरला अन् रब्बीचीही त्याहून वेगळी परिस्थिती नाही. तालुक्यातील बळीराजा दुष्काळाच्या चक्रव्ह्यूहात पुरता अडकून गेला आहे. मजुरांच्या रिकाम्या हातांना काम नाही. जनावरांनाचा चाऱ्याचा भाव गगनाला भिडला आहे. कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणा पट्ट्यात मे महिन्यात वाळवंटासारखी परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. (Drought Girna Patta is suffering due to drought )

गिरणा पट्ट्यात गेल्या ऑगस्ट महिन्यापासून दुष्काळाने अवकळा आली आहे. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामात खर्चही निघणे शेतकऱ्यांना शक्य झाला नाही. तर 'रब्बी'चा सट्टा कोण खेळेल? असा प्रश्न गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांसमोर पडला होता. त्यामुळेच काही प्रमाणात भडगाव तालुका सोडला तर चाळीसगाव तालुक्यात तोटा उभा दिसला नाही. त्यामुळे ‘रब्बी’ची रया गेली आहे.

जनावरांना चारा नाही

गिरणा पट्ट्यात दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याची पार दैना झाली आहे. चाऱ्याचा भाव गगनाला भिडला आहे. जो मक्याचा चारा निरुपयोगी म्हणून जाळला जायचा, त्या चाऱ्यानेही उचल मारली आहे. ऊस कारखान्याऐवजी चारा म्हणून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. भडगाव तालुक्यात मळगाव, पेंडगाव, पथराड, जुवार्डी, आडळसे, तांदुळवाडी, वसंतवाडी, आचळगाव भागात जनावरांच्या स्थलांतराबरोबर विक्रीही वाढली आहे. येथे माणसांना पिण्याच्या पाणी मिळणे जिकरीचे झाले आहे.

पाचोरा तालुक्यातील काही भागात ही परिस्थिती अवघड झाली आहे. तर चाळीसगाव तालुक्यात त्याहून अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. रब्बी हंगाम कोलमडल्याने मजुरांच्या रिकाम्या हातांना काम नाही. त्यामुळे तेही रोजगाराच्या शोधात शहराकडे, उसतोडीणीसाठी धाव घेत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाने काम तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. (latest marathi news)

drought
Dhule Drought News : सातपुड्यातील आदिवासींवरही रोजगारासाठी भटकंतीचा वेळ

शेतशिवारात शुकशुकाट

‘रब्बी’च्या हिरवाईने नटलेल्या शिवारात सध्या दुष्काळामुळे शुकशुकाट आहे. रब्बी हंगामात व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला शेतातील ढेकड राखण करण्याची वेळ आली आहे. विहिरीचे पेट्रोलसारखे उडणाऱ्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

'गिरणा' धरणातून आवर्तन सोडण्यात येत असल्याने महिनाभर गिरणा काठाला दिलासा मिळतो. पण पुढच्या आवर्तनापर्यंत काठावरची गावे कासावीस होतात. त्यामुळे गत दुष्काळापेक्षा यंदाच्या दुष्काळाची दाहकता भयानक आहे. चाळीसगाव तालुक्यात दुष्काळाचे अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रोजगार हमीच्या विहिरी होईना

पाचोरा- भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरींना मान्यता दिल्यास रोजगार उपलब्ध तर होणार आहेच पण शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. शासनाने ‘डार्क झोन’च्या नावाखाली विहीरीच्या कामाना खो दिला आहे. मात्र भूजल सर्वेक्षण विभागाने नव्याने सर्वेक्षण करून विहिरींना मान्यता द्यावी, अशी मागणी होत आहे. तर लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

नेते निवडणुकीत व्यस्त

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावत असल्याने नेते निवडणुकीचे आखाडे गाजवताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे शेतकरी दुष्काळात होरपळला जात असल्याचे चित्र आहे. भडगाव तालुक्यात तुटपुंज्या पाण्यावर ठिकबच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले. मात्र हमीभाव केद्र सरू नसल्याने हमीभावापेक्षा तब्बल हजार रूपये कमी दराने ज्वारी खासगी बाजारात खरेदी केली जात आहे. त्यामुळे नेत्यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणे आवश्यक आहे.

drought
Jalgaon Drought News: पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळी जाहीर; आमदार किशोर पाटील यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com