Jalgaon News : ‘महसूल’च्या दुर्लक्षामुळे गौणखनिजाची खुलेआम वाहतूक! जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्यची मागणी

Jalgaon News : शहरासह ग्रामीण भागात मुरूम, डबर, वाळू यासारख्या गौणखनिजाची खुलेआमपणे वाहतूक केली जात असून, महसूल प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे
minerals transportation
minerals transportationesakal

एरंडोल : शहरासह ग्रामीण भागात मुरूम, डबर, वाळू यासारख्या गौणखनिजाची खुलेआमपणे वाहतूक केली जात असून, महसूल प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गौणखनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे माफिया आणि त्यांचे दलाल तहसीलदार कार्यालय परिसरात ठराविक वेळेला आणि ठराविक ठिकाणी एकत्र येत असतात. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वैयक्तिक लक्ष घालून गौणखनिज चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Jalgaon neglect of revenue open transportation of secondary minerals)

शहरासह ग्रामीण भागात दिवस आणि रात्र गौणखनिजाची बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोरून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गौणखनिजाची वाहतूक केली जात असतानाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.

मुरुमाची दिवसभर वाहतूक केली जात असताना, त्यास पायबंद घालण्यात महसूल प्रशासन असमर्थ ठरले आहे. वाळूमाफियांसह गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सहा महिन्यांपूर्वी उत्राण येथे वाळूमाफियांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता.

प्रांताधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर वाळू वाहतूक बंद होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जात होता. मात्र, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यानंतर वाळूची चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीत वाढ झाल्यामुळे महसूल प्रशासनाचा वाळूमाफियांवरील धाक संपल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केली जात आहे.  (latest marathi news)

minerals transportation
Raigad News: आता रंगणार रायगडची लोकसभा निवडणूक, आठ जणांनी घेतली माघार!

गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांकडे महसूल कर्मचारी केवळ स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांना मोठा राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. चोरट्या मार्गाने गौणखनिजाची वाहतूक करून जास्त दराने ग्राहकांना विकून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे.

सायंकाळी पाचनंतर गौणखनिजाची वाहतूक करणारे व्यावसायिक, त्यांचे सहकारी तहसीलदार कार्यालय परिसरात एकत्र येऊन वाहतुकीबाबत नियोजन करीत असतात. गौणखनिजाची वाहतूक करणारे चालक भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, त्या वाहनांना क्रमांकदेखील नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वत: लक्ष घालून गौणखनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करून नागरिकांचा महसूल प्रशासनावरील उडालेला विश्वास पुन्हा प्राप्त करण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

minerals transportation
International Noise Awareness Day 2024: कर्कश्‍श आवाजाने चिडचिड, डोकेदुखीचे रुग्ण वाढले! हेडफोनचा अतिवापरही कारणीभूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com