School First Day : धम्माल ‘मस्ती की पाठशाला’नंतर आजपासून ‘स्कूल चले हम’; भुसावळ तालुक्यात प्रवेशोत्सवाची उत्सुकता

School First Day : उन्हाळी सुट्ट्यांच्या धम्माल मस्तीनंतर विद्यार्थ्यांचा शनिवार (ता. १५)पासून शाळांमध्ये किलबिलाट होणार आहे.
A school ready and waiting for students.
A school ready and waiting for students.esakal

School First Day : उन्हाळी सुट्ट्यांच्या धम्माल मस्तीनंतर विद्यार्थ्यांचा शनिवार (ता. १५)पासून शाळांमध्ये किलबिलाट होणार आहे. शाळा प्रवेशोत्सव ही संकल्पना पहिल्याच दिवशी राबविली जाणार आहे. यासाठी शाळा प्रशासन व तालुक्याचा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. भुसावळ तालुक्यात वरणगाव, आचेगाव, किन्ही, दीपनगर, साकेगाव, कुऱ्हा असे सहा विभाग व ५४ शाळा आहेत. ( Eagerness of student entrance in Bhusawal taluka of school first day )

टहाकळी, सावतरनिंभोरा, बोहर्डी, कठोरा येथे दोन पदवीधर शिक्षक, दोन शिक्षक एकूण चार पदे रिक्त आहेत, तर वरणगाव येथील केंद्रीय मुलांची शाळा आणि जिल्हा परिषद मुलींची शाळा एकत्र करण्याचा शासनाचा विचार आहे. या शाळांमध्ये एकूण शिक्षकसंख्या सहा आहे. दोन्ही शाळा एकत्र झाल्या, तर दोन शिक्षकांच्या बदल्या होतील. तालुक्यातील बहुतांश शाळांची दुरुस्ती आणि ओरंड्यात नवीन फरशा बसविल्या असून, प्रत्येक शाळेत अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम बनविले आहेत.

याव्यतिरिक्त दुरुस्ती असेल, तर अहवाल मागविले आहेत. अंजनसोडा येथील गळणाऱ्या खोलीत वर्ग भरविले जात नाही. शाळेत पहिली ते चार वर्ग आणि खोल्या ५ आहेत. मात्र, शिक्षक दोनच असल्याने एका खोलीत दोन वर्ग पटसंख्येअभावी भरविले जात आहेत. वरणगाव शाळेला गेट नसल्यामुळे आवारात मद्यप्राशन करणाऱ्यांचा मुक्त संचार आहे. (latest marathi news)

A school ready and waiting for students.
Nashik ZP School News : विद्यार्थ्यांचा जुन्या गणवेशातच पहिला दिवस; मुख्यालयातील विभागप्रमुखांच्या उपस्थितीत रंगणार प्रवेशोत्सव

गळक्या शाळा अन्...

ओझरखेडा शाळा आवारात ग्रामपंचायतचा आरओ प्लांट आहे. त्याचे अतिरिक्त पाणी शाळा आवारात सोडले असून, विद्यार्थ्यांना त्याचा त्रास आहे. शाळेला वॉलकंपाउंड आणि गेट नसल्यामुळे आवारात ग्रामस्थ शेळ्या बांधतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. जोरदार पाऊस झाल्यास सावतरनिंभोरा येथील एक खोली पाझरते. त्यामुळे दोन वर्ग एका खोलीत भरविले जातात. किन्ही आणि चोरवड येथे स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांची कुंचबणा होत आहे.

''पाठ्यपुस्तके तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत पोचली असून, पहिल्याच दिवशी वाटप होणार आहेत. दोन वर्षांपासून भारत निपुण उपक्रम सुरू आहे. गुणवत्तेसाठी भुसावळ तालुका जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर होता. यंदाषीही आपला प्रथम क्रमांक आला पाहिजे, त्यासाठी नियोजन केले आहे.''-किशोर वायकोळे, शिक्षणाधिकारी, भुसावळ

A school ready and waiting for students.
School First Day : अमळनेर तालुक्यातील शाळांना मिळाल्या नवीन खोल्या; काही गावांत कामे सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com