Jalgaon News : प्राथमिक आरोग्य केंद्रांना 8 रुग्णवाहिका; रुग्णांना मिळणार जलद उपचार

Jalgaon : रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
Guardian Minister Gulabrao Patil, Collector Ayush Prasad, CEO Ankit, District Surgeon Dr. Kiran Patil. While launching ambulances
Guardian Minister Gulabrao Patil, Collector Ayush Prasad, CEO Ankit, District Surgeon Dr. Kiran Patil. While launching ambulancesesakal

Jalgaon News : रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवांसाठी उत्तम पायाभूत सुविधा , आवश्यक साधन सामग्री मिळवून देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जिल्ह्याच्या आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Jalgaon Eight ambulances to primary health centre)

उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा २५ रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त ७७ आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून १०२ रुग्णालयात नवीन यंत्र सामग्रीचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ८ रुग्णवाहिकांचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

अल्पबचत भवनात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात नावीन्यपूर्ण योजनेतून उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा २५ आरोग्य संस्था तसेच व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त ७७ आरोग्य संस्थांत ऑपरेशन थिएटर. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil, Collector Ayush Prasad, CEO Ankit, District Surgeon Dr. Kiran Patil. While launching ambulances
Jalgaon News : रेल्वेक्रॉसींगवर ग्रामस्थांचा अडीच तास रास्ता रोको; आमदार चंद्रकांत पाटील आंदोलन स्थळी

रक्त साठवण केंद्र व रुग्णालय बळकटीकरणासाठी खरेदी केलेल्या २७ यंत्रांची श्री पाटील यांनी उपयोगिता जाणून घेतली. अगदी शेवटच्या घटकाला ज्या उपरुग्णालयातून, ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य सुविधा मिळते तिथे साधनांची कमतरता पडू नये म्हणून हे बळकटीकरण केल्याने गरजूंना फायदा होणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

आठ रुग्णवाहिकांची भर

जिल्हा नियोजनच्या निधीमधून बोदवड, न्हावी, अमळगाव , पिंपळगाव हरेश्वर , मेहुणबारे, भडगाव व समया रुगणालयासाठी नव्या आठ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. त्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अल्पबचत भवनच्या समोरील मैदानावरून हिरवा झेंडा दाखवून ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्यात आल्या.

Guardian Minister Gulabrao Patil, Collector Ayush Prasad, CEO Ankit, District Surgeon Dr. Kiran Patil. While launching ambulances
CM Shinde Jalgaon Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com