Laxman Patil aka Lucky Taylor entering the Shiv Sena Thackeray group on Matoshree in the presence of Shiv Sena's Uddhav Thackeray party chief Uddhav Thackeray.
Laxman Patil aka Lucky Taylor entering the Shiv Sena Thackeray group on Matoshree in the presence of Shiv Sena's Uddhav Thackeray party chief Uddhav Thackeray.esakal

Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश जोरात; शिंदे गटाच्या अस्मिता पाटील शिवसेना ठाकरे गटात

Jalgaon News : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे लकी टेलर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे लकी टेलर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीची जोर सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षाला धक्का देताना भाजपचे खासदार उन्मेष पाटील. (Jalgaon Lok Sabha Election)

पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना प्रवेश दिला. त्यानंतर आज मुंबईत मातोश्री निवासस्थानी भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी टेलर.

पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाच्या अस्मिता पाटील. भाजपच्या माजी नगरसेविका सरीता नेरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. (latest marathi news)

Laxman Patil aka Lucky Taylor entering the Shiv Sena Thackeray group on Matoshree in the presence of Shiv Sena's Uddhav Thackeray party chief Uddhav Thackeray.
Jalgaon Ration Shop : रेशन दुकानदारांना फोरजी ई-पॉस मशीन; पारोळ्यात वितरण

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना नेते सुभाष देसाई,माजी खासदार उन्मेष पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे, धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, आदींची उपस्थिती होती.

Laxman Patil aka Lucky Taylor entering the Shiv Sena Thackeray group on Matoshree in the presence of Shiv Sena's Uddhav Thackeray party chief Uddhav Thackeray.
Jalgaon Agriculture News : ज्वारी उत्पादकांना साडे तिनशे कोटीहून अधिक दणका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com