जळगाव : एरंडोल शहरातील विविध विकासकामांसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Development work fund sanctioned

जळगाव : एरंडोल शहरातील विविध विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

एरंडोल : शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असणाऱ्या अंजनी नदीच्या काठावरील कासोदा दरवाजा ते महादेव मंदिरापर्यंत रस्ता, नदीकाठाला संरक्षक भिंत, विद्युतीकरण, वृक्षारोपण व परिसराचे सुशोभीकरण या कामांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

शहरातील अंजनी नदी काठालगत असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून त्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांनी अनेक वर्षांपासून केली होती. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्यावरून पायी चालणेदेखील मुश्कील झाले होते. रस्त्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे नदीच्या पात्रातील पाणी रस्त्यावर येऊन तुंबत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढत होता. गांधीपुरा आणि शहरातील नागरिकांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन रस्त्याची समस्या सोडविण्याची मागणी केली होती.

आमदार चिमणराव पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी तसेच रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधकाम, रस्त्यावर विद्युतीकरण व दोन्ही बाजूस वृक्षारोपण यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून नदी पात्रालगतचे सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे.

पुलाच्या बांधकामासाठी साडेतीन कोटी

यापूर्वी देखील आमदार चिमणराव पाटील यांनी रंगारी खिडकी ते गांधीपुरा या भागाला जोडणाऱ्या अंजनी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या पुलाच्या बांधकामास प्रारंभ झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील नवीन वसाहती आणि गावातील रस्त्यांसाठी देखील आमदार पाटील यांनी शासनाकडून निधी मंजूर केला आहे. आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शहरातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: Jalgaon Erandol City Various Development Work Fund Sanctioned

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top