कुटुंबाला अडवून ६ जणांना कालव्यात फेकलं, आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू; महाराष्ट्रातून गुजरातला कामासाठी जाताना धक्कादायक घटना

Jalgaon News जळगावमधील एक कुटुंब कामाच्या शोधात गुजरातच्या सूरतला जात असताना धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबातील ६ जणांना चार अज्ञातांनी कालव्यात फेकलं. यात तिघांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत.
Jalgaon Family Attacked in Gujarat

Jalgaon Family Attacked in Gujarat

Esakal

Updated on: 

जळगावमधील एका कुटुंबासोबत गुजरातमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कामाच्या शोधात सुरतला निघालेल्या सहा जणांना चार जणांनी अडवलं आणि कालव्याच्या खोल पाण्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर १३ वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला आहे. कुटुंबातील अन्य दोन मुलं अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...