Jalgaon Fire Accident : एमआयडीसीत केमिकल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; जळगावातील दुर्घटना

Jalgaon News : शहरातील औद्योगिक वसाहतीत डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत बुधवारी (ता. १७) सकाळी नऊला भीषण स्फोट होऊन आग लागली.
Morya Global Ltd. in W Sector Industrial Estate. The company suffered a major fire due to an explosion of a boiler, firemen fighting a fire.
Morya Global Ltd. in W Sector Industrial Estate. The company suffered a major fire due to an explosion of a boiler, firemen fighting a fire.esakal

Jalgaon News : शहरातील औद्योगिक वसाहतीत डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत बुधवारी (ता. १७) सकाळी नऊला भीषण स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत दोन कामगार जागीच मृत्युमुखी पडले; तर २३ कामगार जखमी झाले आहेत. पैकी आठ ते दहा जण गंभीर असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Jalgaon Fire Accident Two killed in explosion at chemical company in MIDC)

दुर्घटना एवढी भीषण होती, की स्फोटाचा आवाज दूरपर्यंत पसरला. आगीचे लोळही मोठ्या प्रमाणात उठत होते. जळगाव महापालिकेसह जिल्ह्यातील अन्य पालिका, नगर परिषदा, जैन इरिगेशन अशा विविध ठिकाणांहून जवळपास ५०- ६० बंबांनी एकामागून येत शर्थीचे प्रयत्न करीत पाच तासांनंतर ही आग आटोक्यात आणली.

अशी घडली दुर्घटना

घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, जळगाव ‘एमआयडीसी’तील डब्ल्यू सेक्टरमध्ये मुंबई येथील आदित्य निंबाळकर यांच्या मालकीच्या मोरया ग्लोबल लिमिटेड या केमिकल कंपनीत ही घटना घडली. बुधवारी (ता. १७) कामाची पहिली शिफ्ट सुरू झाल्यावर सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी केमिकल बॉयलरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून कामगारांनी बाहेर धाव घेतली. आगीत २३ कामगार जखमी झाल्याची माहिती असून, त्यात आठ ते दहा जण गंभीर आहेत.

पन्नासहून अधिक बंबांची सेवा

घटनास्थळी आग विझविण्याकामी दुपारी बारापर्यंत जवळपास ५० पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब रिकामे झाले होते. जळगाव शहर महानगरपालिका, जैन इरिगेशन, धरणगाव नगर परिषद, पाचोरा नगर परिषद, नशिराबाद नगर परिषद, जामनेर नगर परिषद, वरणगाव नगर परिषदेच्या बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले. (latest marathi news)

Morya Global Ltd. in W Sector Industrial Estate. The company suffered a major fire due to an explosion of a boiler, firemen fighting a fire.
Nashik Accident News : मुंगसे गावाजवळील अपघातात नातीसह आजोबा ठार; संतप्त ग्रामस्थांचा अडीच तास रास्ता रोको

दोघांचा जागीच मृत्यू

कंपनीत सकाळची शिफ्ट सुरू झाली, तेव्हा २५ कामगार काम करीत होते. दुर्घटनेनंतर बचाव पथकाने तातडीने उपाययोजना करीत २३ कामगारांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढले. समाधान पाटील व रामदास घाणेकर हे बेपत्ता होते. सायंकाळपर्यंत दोन मृतदेह हाती आले. आता ते नेमके कोणाचे आहेत, हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. जे कामगार बेपत्ता होते व ज्यांचे मृतदेह सापडले, त्या मृतदेहांची डीएनए चाचणी केल्यावर त्यांची ओळख पटणार आहे.

जखमींमध्ये यांचा समावेश

हेमंत गोविंदा भंगाळे (वय २७, रा. प्रभात कॉलनी), मयूर राजू खैरनार (२७, रा. जुना खेडी रोड), विशाल रवींद्र बारी (२८, रा. श्रीकृष्णनगर, जुने जळगाव), सचिन श्रावण चौधरी (२४, रा. रामेश्वर कॉलनी), गोपाल आत्माराम पाटील (रा. विखरण, ता. एरंडोल ह. मु. अयोध्यानगर), भिकन पुंडलिक खैरनार (४२, रा. इच्छादेवी परिसर), चंद्रकांत लक्ष्मण पाटील (२४, रा. धुळे, ह. मु. रामेश्वर कॉलनी), जगजीवन अनंत परब (५३, रा. अयोध्यानगर), रमेश अजमल पवार (२१, रा. रामेश्वर कॉलनी).

Morya Global Ltd. in W Sector Industrial Estate. The company suffered a major fire due to an explosion of a boiler, firemen fighting a fire.
Pune Fire Accident : कशी लागली भाऊ रंगारी गणपतीसमोरील जुन्या वाड्याला आग?

नवाज समीर तडवी (५१, रा. अशोक किराणा दुकान, रामेश्वर कॉलनी), दीपक वामन सुवा (२५, रा. विठोबानगर, कालिकामातानगर), नंदू छगन पवार (३५, रा. रामेश्वर कॉलनी), कपिल राजेंद्र पाटील (२४, रा. आव्हाणे, ता. जळगाव), आनंद छगन जगदेव (३८, रा. रामेश्वर कॉलनी), गणेश रघुनाथ सोनवणे (५०, रा. सुप्रीम कॉलनी).

फिरोज रज्जाक तडवी (४०, रा. रामेश्वर कॉलनी), किशोर दत्तात्रय चौधरी (५०, रा. रामेश्वर कॉलनी), चंद्रकांत दशरथ घोडेराव (४७, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. यापैकी आठ ते दहा जण गंभीर असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींना जळगाव सामान्य रुग्णालय, ओम क्रिटिकल केअर सेंटर, खुशी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व न्यू मंगलमूर्ती हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Morya Global Ltd. in W Sector Industrial Estate. The company suffered a major fire due to an explosion of a boiler, firemen fighting a fire.
Accident News : वऱ्हाड घेवून निघालेल्या चारचाकी गाडीचा अपघात; सात जणांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com