Accident News : वऱ्हाड घेवून निघालेल्या चारचाकी गाडीचा अपघात; सात जणांचा मृत्यू

Accident News : वऱ्हाड घेवून निघालेल्या चारचाकी गाडीचा अपघात; सात जणांचा मृत्यू

ढालगांवः विजापुर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील जांभुळवाडी फाट्याजवळ चारचाकी गाडीने खाजगी बसला पाठीमागुन धडक दिल्याने चारचाकीमधील सातजण ठार झाल्याची घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. चारचाकीतील प्रवाशी हे कर्नाटकातील जमखंडी येथून असून ते सावर्डे (ता. तासगाव) येथे लग्नासाठी वऱ्हाड घेवून निघाले होते. घटनेनंतर चारचाकीच्या पुढच्या भागाला आग लागली होती. मात्र स्थानिक लोकांनी पाणी आणून आग नियंत्रणात आणली.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की, चारचाकी गाडी क्रमांक (केए ३४ बी ५५७५) यामधुन १७ प्रवाशी तासगाव तालुक्यातील सावर्डे या गावी लग्नासाठी चालले होते. सावर्डे येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी मुलगी आणण्यासाठी सावर्डे गावातुन एक गाडी पाठविण्यात आली होती लग्नाचे वऱ्हाड घेऊन येताना सोबत चार ते पाच गाड्या होत्या. त्यातील एका गाडीचा आपघात झाला आहे.

Accident News : वऱ्हाड घेवून निघालेल्या चारचाकी गाडीचा अपघात; सात जणांचा मृत्यू
Solapur Loksabha 2024 : सोलापुरात चाललंय काय? विधानसभेचा शब्द कुणाला? अभिजीत पाटलांना की भगीरथ भालकेंना?

सांयकाळी साडेसातच्या सुमारास जांभुळवाडी पाट्यापासून जवळच एका ढाब्याजवळ जतवरुन मुंबईला जाणारी तिरुपती नावाची बस (एनल०१ १५६५) पुढे निघाली होती. पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की चारचाकी थेट बसच्या खाली घुसल्याने चारचाकीमधील सातजण ठार झाले. आपघात इतका भिषण होता की अपघातानंतर चारचाकीच्या पुढच्या भागाला आग लागली स्थानिक लोकांनी पाणी आणून आग विजविण्यात आली.

घटनेत जखमी व मृत्यू झालेल्या व्यक्तींना कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालय, जत व मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरज बिजली व त्यांचे पथक, कवठेमंकाळ पोलिस घटनेनंतर दाखल होऊन ठार व जखमी झालेल्या व्यक्तींची ओळख पटवली जात होती. मृत्यु झालेल्या व्यक्तींची नावे रात्री उशीरापर्यंत समजू शकली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com