Jalgaon Water Scarcity : टंचाईग्रस्त खेडीढोकला पहिले टँकर सुरू

Jalgaon Water Scarcity : तालुक्यात यंदा कमी पाउस झाल्याने तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांचे तळ दिसायला सुरुवात झाली आहे.
Tanker pouring water into the well employees
Tanker pouring water into the well employeesesakal

Jalgaon Water Scarcity : तालुक्यात यंदा कमी पाउस झाल्याने तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांचे तळ दिसायला सुरुवात झाली आहे. खेडीढोक (ता.पारोळा) आज पहिला टँकर सुरु झाला. येथे चार खेपेत पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्नाला तोंड द्यावे लागण्याचे संकेत आहेत.

तालुक्यातील मध्यम प्रकल्प तामसवाडी,तर लघु प्रकल्प भोकरबारी, म्हसवे, इंदासी, लोणी यांच्या जलसाठ्यात शंभर टक्के वाढ झाली नव्हती. (Jalgaon first tanker of water to shortage affected Khedi Dhok)

त्यामुळे पिण्याचा प्रश्न तसेच पशुधन व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच अवकाळी पावसाचा फटका यामुळे तालुका हा पूर्णपणे होरपळला आहे. खेडी ढोक (ता. पारोळा) येथे पाणीटंचाईशी गावातील नागरिकांना सामना करावा लागतो आहे.

तहसीलदार डॉ. उल्हास देवरे व गटविकास अधिकारी किशोर शिंदे ,शेळावे मंडळ अधिकारी वैशाली जाधव ,तलाठी राकेश काळमेघ यांनी खेडी ढोक गावात पाणीटंचाईग्रस्त भागात भेट दिली.

Tanker pouring water into the well employees
Jalgaon Political News : भाजपच्या उमेदवार निश्‍चितीनंतर विरोधकांची नावे ठरणार!

जलाशयाची पाहणी केली आदर्श नगरच्या प्लॉटच्या भागात विहिरीला यंदा पाणी नसल्यामुळे परिसरात पाण्याची गंभीर समस्या आहे .

तहसीलदार डॉ. देवरे यांनी तात्काळ खेडीढोक ग्रामपंचायत व जलसाठे पाहिल्यानंतर पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पाणी टँकर सुरू करण्यसाठी जानेवारीत पंचायत समितीकडे प्रस्ताव दिल्याचे ग्रामसेविका मनिषा गोविंद भामरे यांनी सांगितले. सरपंच उज्वला गोरख भिल व उपसरपंच वैशाली गणसिंग राजपूत लक्ष ठेउन आहेत.

Tanker pouring water into the well employees
Jalgaon News : जळगावहून लवकरच प्रवाशी विमानसेवा सुरू होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com