Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात सुरेशदादा इज बॅक...; भूमिकेबाबत समर्थकांना प्रतीक्षा

Suresh Jain
Suresh Jainesakal

जळगाव : घरकुल गैरव्यवहार प्रकरणात अटक झाल्यानंतर सुरेशदादा जैन यांनी कारागृहातूनच २०१४ ची विधानसभा निवडणूक लढली असली, तरी त्यात ते पराभूत झाले होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. आता त्यांना जामीन मिळाला असून, ते पुन्हा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात ‘कमबॅक’ करतात का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने श्री. जैन यांना बुधवारी (ता. ३०) नियमित जामीन मंजूर केला. आतापर्यंत त्यांच्या जळगावातील येण्यावर निर्बंध होते. तेही या नियमित जामिनामुळे शिथिल झाले आहेत. सुरेशदादा आता कुठेही फिरू शकतात, ते आता जळगाव येथेही लवकर येतील, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सलग 9 वेळा आमदार

सुरेशदादा जैन यांचा जळगाव जिल्हाच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा होता. जळगाव विधानसभा मतदारसंघातून सलग नऊवेळा ते निवडून आले आहेत. १९८५ पासून जळगाव पालिकेवर त्यांचे तब्बल ३० वर्षे वर्चस्व होते. आताही त्यांच्या नेतृत्वाखालील जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. याशिवाय सहकार क्षेत्रातही त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

Suresh Jain
CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांची टीका नैराश्‍यातून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आठ वर्षांपासून अलिप्त

जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहारप्रकरणी ते वैद्यकीय जमिनावर होते. त्यामुळे ते पूर्णपणे राजकारणापासून अलिप्त आहेत. ते राजकारणापासून अलिप्त असले, तरी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कट्टर समर्थकांनी २०१८ मध्ये जळगाव महापालिकेत निवडणूक लढविली. भाजपपुढे त्यांचा पराभव झाला. केवळ १५ जागा शिवसेनेला मिळाल्या. मात्र, पुढे अडीच वर्षांनंतर भाजपचे नगरसेवक फुटले आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या. त्यामुळे आजही महापालिकेत सुरेशदादा जैन यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता असल्याचे सांगण्यात येते.

Suresh Jain
Nana Patole on CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

जळगावात नेतृत्वाची पोकळी

सुरेशदादा जैन राजकारणापासून अनेक वर्षे अलिप्त असल्यामुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नियमित जामीन मिळाल्यामुळे ते आता जळगावात येऊ शकतात. मात्र, राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचे की नाही, याबाबतचा संपूर्ण निर्णय त्यांच्याच मतावर अवंलबून आहे. मात्र, त्यांचे कार्यकर्ते अद्यापही सुरेशदादा राजकीय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यास जळगावच्या राजकाणात मोठा उलटफेर होईल, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय तज्ज्ञाची गरज नाही.

राजकारणाचा वळसा

राज्याच्या राजकारणाने मोठा वळसा घेतला आहे. सुरेशदादा जैन ज्या शिवसेनेत होते, त्याच शिवसेनेचे आज दोन गट झाले आहेत. शिवाय एकेकाळी भाजपसोबत असलेली ठाकरे यांची शिवसेना आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आहे, तर शिवसेनेतून बाहेर पडले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते भाजपसोबत आहेत. त्यामुळे या बदलत्या समीकरणात जळगाव महापालिकेत सत्तेत असलेली शिवसेना आज ठाकरे गटासोबत आहे. मात्र, दुसरीकडे भाजपचे नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे सुरेशदादा जैन यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही ते कधीही लपविलेले नाहीत. २०१४ पासून सुरेशदादा राजकारणापासून अलिप्त आहेत. अगदी २०१८ च्या महापालिका निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा प्रचार झाला, तरी त्यांनी निवेदनही केलेले नव्हते. त्यामुळे आज ते जळगावात येत आहेत.

Suresh Jain
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेऊन का फिरतात? 

दुसरी इनिंग खेळणार?

त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत अद्यापही अनभिज्ञता आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार ते राजकारणात सक्रिय होत असतील, ते खऱ्या अर्थाने असलली दुसरी राजकीय इनिंग खेळणार असतील, तर त्यांची पक्षीय भूमिका काय असेल, हे तेच सांगू शकतील. मात्र ते राजकारणात सक्रिय झाल्यास आजही त्या पक्षाला ताकद देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची सुरेशदादांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com