CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांची टीका नैराश्‍यातून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘फ्रिजएवढी खोकी कोणाकडे?’
cm eknath shinde
cm eknath shindeEsakal

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नैराश्यातून काहीही वक्तव्य करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘त्यांना अपेक्षेपेक्षा आधिक नैराश्य आले आहे,’ असा टोलाही शिंदे यांनी लगावला. दोन दिवसांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुंबई विमानतळावर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘यापूर्वी असलेली महाराष्ट्रातील नकारात्मकता आमचे सरकार आल्यानंतर बदलली आहे. आमच्या सरकारबद्दल लोकांचे मत चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे,’’ असा दावा शिंदे यांनी केला.

विरोधकांनी शिवसेनेतील बंडानंतर शिंदे सरकारला खोके सरकार म्हणून हिणवणे सुरूच ठेवले आहे. उद्धव यांनी बुलडाण्यातील सभेत खोक्यांचा उल्लेख केला. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘‘शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फ्रिजएवढ्या खोक्यांचा उल्लेख केलाच आहे. हे फ्रीज एवढे खोके कोणाकडे गेले, याचा मी शोध घेणार आहे. आमदारांची खोकी लहान होती. पण कंटेनरमधून आणलेली खोकी कोण पचवू शकतो, हे महाराष्ट्राला माहिती आहे.’’

दादा भुसे समन्वयक

आसाममध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज गुवाहाटीमध्ये केली. त्यासाठी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. आसाम केडरच्या मराठी अधिकाऱ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने तशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com