Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपची घरवापसी उमेदवारी अर्ज दाखलच्या दिवशी?

Jalgaon News : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात आपण ‘घरवापसी’ करण्याची घोषणा केली आहे.
Eknath Khadse
Eknath Khadseesakal

Jalgaon News : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात आपण ‘घरवापसी’ करण्याची घोषणा केली आहे. त्यांनाही, पक्षाने घरवापसी करून घेण्याची प्रतिक्षा आहे. मात्र त्यांची ही घरवापसी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Jalgaon Former state minister and NCP MLA Eknath Khadse announced his return to Bharatiya Janata Party)

एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये आपण भारतीय जनता पक्षात ‘घरवापसी’करीत असल्याची घोषणा केली. आपल्या भाजपमधील या घरवापसीला केंद्रांतील नेत्यांचा हिरवा कंदील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.केंद्रांतील नेत्यांनी आपला घरवापसीचा प्रवेश लवकर करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले होते.

त्यानंतर त्यांचा प्रवेश केव्हा होणार याकडे आता पक्षाचे लक्ष आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसीची घोषणा केली आहे, दुसरीकडे त्यांच्या प्रवेश सोहळ्याची प्रतिक्षा असतानाच राज्यातील पक्षाचे नेत्यांनी मात्र वेगळीच विधाने केली होती.पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाच्या केंद्रातील वरिष्ठांनी आपणास काही कळविलेले नाही.

परंतु ते पक्ष प्रवेश करीत असतील तर त्यांचे स्वागत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनीही त्यांच्या टीका केली परंतु उपहासात्मक त्यांनी म्हटले होते, की केंद्रांतील नेत्यांकडून त्यांनी मंजूरी आणली त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रवेशाला विरोध करणार कोण आहोत?त्याच वेळी खडसे हे विझलेला दिवा असल्याचीही त्यांनी टीका केली होती. (latest marathi news)

Eknath Khadse
Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश जोरात; शिंदे गटाच्या अस्मिता पाटील शिवसेना ठाकरे गटात

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनीही एकनाथ खडसे यांच्या अनेक चौकशा सुरू होत्या,त्यांना वैयक्तीक त्रास होता, त्यामुळे तुम्हाला तिथे जावून तो त्रास कमी होत असेल तर आमची हरकत नसणार आहे. असे मत व्यक्त केले होते. या शिवाय त्यांची आमदारकीही आपण परत घेणार नाही असे वक्तव्य केले होते. एकनाथ खडसे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर करून घ्यावा असे आवाहन केले आहे.

त्यामुळे हा प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम दिल्लीत होणार की दिल्लीतील नेते जळगावात येऊन हा प्रवेश सोहळा करणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी हा प्रवेशाचा सोहळा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जिल्ह्यात एक वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे.भाजपच्या उमेदवारांना ते फायदेशीर ठरणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश कधी,केव्हा आणि कोणाच्या उपस्थितीत होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Eknath Khadse
Jalgaon Agriculture News : ज्वारी उत्पादकांना साडे तिनशे कोटीहून अधिक दणका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com