Jalgaon News : शहरात रस्त्यांची कामे सुरू, प्रचारासाठी फिरा; आचारसंहितेपूर्वी विविध निधीतून मंजूर झालेली कामे वेगाने सुरू

Jalgaon News : जळगावकरांनी रस्त्यांच्या कामांबाबत अनेक वेळा आवाज उठविला. त्यानंतर राज्य शासनाकडून निधी मिळाला असून, आता विविध निधीतून शहरातील तब्बल ८० टक्के रस्त्यांची कामे सुरू आहेत.
Road Construction
Road Constructionesakal

Jalgaon News : जळगावकरांनी रस्त्यांच्या कामांबाबत अनेक वेळा आवाज उठविला. त्यानंतर राज्य शासनाकडून निधी मिळाला असून, आता विविध निधीतून शहरातील तब्बल ८० टक्के रस्त्यांची कामे सुरू आहेत. २० टक्के कामे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर उर्वरित निधीतून होतील, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिली. (Jalgaon Funds received from state government and now almost 80 percent of road works in city are underway)

८० टक्के कामे झाल्याने आता लोकसभेच्या प्रचारासाठी राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांना फिरताना खड्ड्यांचा त्रास होणार नाही. जळगाव शहरातील सर्वच भागांतील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. वाहन चालविणे तर सोडाच काही ठिकाणी चालणेही कठीण झाले होते. अनेक भागांत नागरिकांनी रस्त्यांच्या कामासाठी आंदोलने केली.

जळगावकरांच्या संतापाची दखल घेऊन राज्य शासनाने रस्त्यांसाठी ४२ कोटी, शंभर कोटी, तसेच जिल्हा नियोजनातून तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे हा निधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर केला होता.

महापालिकेतर्फेही शहरातील विविध भागांतील रस्त्याच्या कामांची यादी शासनाला पाठविली होती. शासनाने हा निधी मंजूर केला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची काम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या रस्त्यांची कामे आता सुरू झाली आहेत. (latest marathi news)

Road Construction
Jalgaon News : वेतनासाठी 49 कोटी 52 लाख 69 हजार मंजूर; शिक्षकांचा वेतन प्रश्न सुटल्याने मराठी नववर्षानंतर हर्ष उल्हास

तब्बल ९५ रस्त्यांची कामे सुरू

शहरातील रस्त्यांची कामे आता वेगाने सुरू आहेत. जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मक्तेदारांना आदेश दिले आहेत. शहरात आजच्या स्थितीत तब्बल ९५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. यात जिल्हा नियोजन मंडळाच्या ३० कोटी, शासनाच्या शंभर कोटी व ४२ कोटींतून कामे सुरू आहेत. यात बहुतांश कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत असून, ती सर्व क्रॉंकिटची आहेत.

२० टक्के कामे बाकी

सध्याच्या स्थितीत रस्त्यांची ८०टक्के कामे सुरू आहेत. केवळ २० टक्के कामे बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर २० टक्के निधीतील कामेही सुरू करण्यात येईल. त्यामुळे शहरातील शंभर टक्के रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

"शहरातील रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळ, राज्य शासनाकडून निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यातून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची कामे सुरू आहेत. तब्बल ८० टक्के कामे पूर्ण होत आहेत." -चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका, जळगाव

Road Construction
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव मतदारसंघात दुरावलेली मने जुळली; करण पवारांना पक्षांतराचा निर्णय लाभदायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com