Jalgaon News : चाराटंचाईमुळे गोशाळामालकांची कोंडी; दानशूरांकडून मदतीची अपेक्षा

Jalgaon : जवळच असलेल्या लोणी (ता. चोपडा) फाट्याजवळील दगूबाई बाप किसन विसपुते गोशाळेत चाराटंचाई निर्माण झाली आहे.
Cows in Dagubai Vispute Goshala near Phata.
Cows in Dagubai Vispute Goshala near Phata.esakal

Jalgaon News : येथून जवळच असलेल्या लोणी (ता. चोपडा) फाट्याजवळील दगूबाई बाप किसन विसपुते गोशाळेत चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गायींच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवावा, असा प्रश्‍न गोशाळामालकांसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान, समाजातील दानशूर व्यक्तींकडून चाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आवश्‍यक मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अडावद येथील सामाजिक कार्यकर्ते विजय विसपुते यांनी २०१७मध्ये लोणी फाट्याजवळील स्वतःच्या मालकीचा शेतात ही गोशाळा सुरू केली. ( Goshala owners are face problem due to fodder shortage )

सात वर्षांनंतरही त्यांना शासनाकडून अनुदान मिळाले नाही. म्हणून ते घरूनच गायींना चाऱ्यासाठी वर्षकाठी दोन ते अळीच लाख रुपये खर्च करतात. गायींची व्यवस्था करण्यासाठी दोन गड्यांना वर्षाकाठी दोन लाख रुपये मजुरी द्यावी लागते. त्यातच आता चारा महागल्याने गोशाळामालकाचीही आर्थिक कोंडी होत आहे. म्हणून आता दानशूर व्यक्तींकडूनच दादर, ज्वारी, बाजरी, मका यांचा चारा किंवा कुट्टी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दानशूरांनी चारा उपलब्ध करून दिल्यास किमान पावसाळ्यातील गायींचा चाऱ्याचा प्रश्न मिटू शकतो. (latest marathi news)

Cows in Dagubai Vispute Goshala near Phata.
Jalgaon News: अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाने कांद्याच्या उत्पादनात घट! लावलेला खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

गायींच्या संगोपनासाठी दोन मोठे गोठे बांधली आहेत. तीन गोठ्यांत चाऱ्यांची व्यवस्था केली आहे. गाई गोठ्यातच असतात. बाहेर चाऱ्यासाठी घेऊन जात नाहीत. म्हणून त्यांची देखभाल करण्यासाठी दोन माणसे आहेत. पाच शेड उभारले आहेत. पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एवढे खर्च करूनही शासन मात्र, अनुदान देत नाही. त्यामुळे आम्ही आता करायच तरी काय? असा प्रश्न गोशाळामालकांसमोर निर्माण झाला आहे. तरी शासनाने गोशाळेला त्वरित अनुदान द्यावे, अशी मागणी गोशाळाचालकांनी शासनाकडे केली आहे.

''सात वर्षांपासून गोशाळा सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे शासकीय मिळाले नाही. म्हणून गायींवरील खर्च मी घरूनच करीत आहे. गायींच्या देखभालीसाठीदेखील असलेल्या दोन्ही गड्यांची मजुरीही मी घरूनच पैसे देत आहे. त्यातच चारा महागल्याने शासनाने गोशाळेला त्वरित अनुदान द्यावे किंवा चारातरी उपलब्ध करून द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.''- विजय विसपुते, गोशाळा संचालक तथा शेतकरी, अडावद (ता. चोपडा)

Cows in Dagubai Vispute Goshala near Phata.
Jalgaon News : रशियातील अमळनेरच्या विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com