Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patilsakal

जळगाव : हेमामालिनीप्रकरणी अखेर गुलाबरावांकडून दिलगिरी

भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Published on

जळगाव : अभिनेत्री हेमामालिनीबद्दल (actress hemamailini) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत समाज माध्यमांवर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil)यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या बोलण्याचा वाईट उद्देश नव्हता, आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे मावळे आहोत. आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. तरी आपल्या बोलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Minister Gulabrao Patil
Solapur : उपमहापौर आणि भाजप नगरसेवक राजेश काळे २ वर्षांसाठी तडीपार

बोदवडला एका जाहीर सभेला संबोधताना मंत्री पाटील यांनी धरणगावातील रस्त्यांचा दाखला देताना ‘जर धरणगावात हेमामालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा देईन’ असे व्यक्तव्य केले होते. यावर विरोधी पक्षासह समाज माध्यमांवर टीका होऊ लागली होती. विरोधी पक्षाकडून पाटील यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. त्यावर अखेर पाटीलयांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com