Jalgaon News : उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर! हॉटेल, ढाबे, मिठाई विक्रेत्यांकडून सर्रास उल्लंघन

Jalgaon News : शहरातील सर्व मुख्य रस्ते, चौक, शाळा- महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या बाहेर देखील अनेक व्यावसायिकांनी हातगाड्या लावून दुकाने थाटली आहेत.
street food
street foodesakal

वरणगाव : शहरामध्ये लहान मोठ्या व्यावसायिक दृष्टीकोनातून हॉटेल, ढाबे, दूध डेअरी, मिठाई विक्रेते, खाद्यपदार्थांचे ठेले, नास्ता, चायनिज पदार्थांच्या गाड्या असे विविध खाद्य प्रकार मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी उघड्यावर ठेवून त्यांची सर्रास विक्री केली जात आहे. अन्न व औषध विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वरणगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Health issues due to open food in varangaon)

शहरातील सर्व मुख्य रस्ते, चौक, शाळा- महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या बाहेर देखील अनेक व्यावसायिकांनी हातगाड्या लावून दुकाने थाटली आहेत. शहरातील नवीन व जुन्या महामार्ग कडेलाच उघड्यावर अन्नपदार्थ तयार करून सर्रास विक्री केली जाते. अनेक हॉटेलचालक पदार्थ बनविण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर करतात.

तसेच हे विक्रेते खाद्य तेलाचा सर्रास पुनर्वापर करीत असल्याच्या तक्रारी असून शहरांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अशा तेलात तळलेले खाद्यपदार्थ शरिरात कोलेस्ट्रॉल वाढवितात. सोबतच वारंवार वापरणाऱ्या तेलामुळे हृदयाला धोका निर्माण करतात. पोटाचे आणि किडनी व अस्थमाचे आजारही बळावतात.

शहरांत बोटावर मोजण्या इतकेच व्यावसायिक परवानाधारक आहेत. मात्र तेही विना परवानगी धारकांप्रमाणे नियमांचे उलंघन करून करीत असल्याचे समोर येत आहे. बहुधा ठिकाणी कर्मचाऱ्यांचे माखलेले हात, त्यांच्या कपड्याची बिकट अवस्था, वाढलेली बोटांची नखे, डोक्यावरील वाढेलेले केस स्वयंपाक ठिकाणी सर्वत्र दुर्गंधीयुक्त घाण व उग्र वास अशी परिस्थिती आहे. (latest marathi news)

street food
Jalgaon News : जिल्हा रुग्णालयात उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष; मेमध्ये तीव्र उन्हाच्या झळा

त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून अधून-मधून अशा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारणे अपेक्षित आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वरणगाव येथे अद्याप खाद्य पदार्थासंदर्भात कारवाई झाली नसल्यामुळे याची फारशी भीती व्यावसायिकांमध्ये दिसून येत नाही. आणि कुठे कारवाई झाली तर नियमानुसार दंड भरुन पुन्हा आपला व्यवसाय त्याच पद्धतीने सुरू ठेवता येतो.

या अविर्भावात व्यावसायिक आहेत, शहरातील हॉटेल, ढाबे, दुधडेअरी, मिठाई विक्रेते, खाद्यपदार्थांचे ठेले, नास्ता, चायनिज पदार्थांच्या शेकडो गाड्या व दुग्धजन्य पदार्थांचे विविध खाद्य प्रकारांच्या व्यावसायिकांची नियमित चौकशी होणे अपेक्षित आहे.-

अस्वच्छता अन् धुळीचे लोट

बहुतेक ठिकाणी अन्नपदार्थ सुरक्षितरित्या झाकून ठेवण्यात येत नाहीत. अनेक ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली असते. उघडे पदार्थ असल्यामुळे रस्त्यावरी धूळ त्या अन्नपदार्थांवर उडत असते आणि तेच पदार्थ दुकानदार ग्राहकांना विकत आहे. सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याने ग्राहकांनाही नाइलाजाने ते पदार्थ विकत घ्यावे लागत आहे.

शहराच्या अनेक भागामध्ये रस्त्याची कामे सुरू असून बहुतांश ठिकाणी धुळीचे लोट उघड्या अन्नपदार्थावर ही जात असल्याने हे अन्नपदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्यामुळे वरणगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरी अन्न व औषध प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

street food
Jalgaon Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी जळगावला मुक्कामी थांबणार; नाराजांशी चर्चेसह व्यूहरचनेवर भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com