तरुणी ड्रग्जच्या आहारी, दारू पाजून कारमध्येच बळजबरी; फोटोवरून ब्लॅकमेल करत तरुणाकडून वारंवार अत्याचार, तिघांवर गुन्हा

Jalgaon Crime News तरुणाने तरुणीला दारू पाजून तिच्यावर कारमध्ये अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढून तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Young Woman's Complaint Triggers Major Probe in Jalgaon

Young Woman's Complaint Triggers Major Probe in Jalgaon

Esakal

Updated on

जळगाव शहरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने तरुणीला दारू पाजून तिच्यावर कारमध्ये अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढून तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित निर्मल दिनेश तिवारी (रा. प्रजापतीनगर), जय चौधरी (शिव कॉलनी) आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com