Jalgaon News : लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगीनघाई; सोमवारच्या आठवडे बाजारात गावरान कैऱ्या झाल्या आंबट

Jalgaon News : सर्वत्र खरीप पेरणीचे वेध लागले असून, पावसाळ्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे.
mango pickle
mango pickleesakal

वावडे (ता. अमळनेर) : सर्वत्र खरीप पेरणीचे वेध लागले असून, पावसाळ्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. बाजारात कितीही प्रकारचे लोणचे तयार लोणचे उपलब्ध असले तरी घरच्या लोणच्याची चवच न्यारी असते. अशा प्रत्येकाला आवडणाऱ्या लोणच्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या हिरव्यागार कैऱ्या दाखल झाल्या असून, बाजारात कैऱ्या घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. (Housewives have started busy making pickle before monsoon)

बाजारात गावरान कैऱ्याची आवक जेमतेम होऊन त्याचे भाव दामदुप्पट झाल्याने लोणच्यासाठी लागणाऱ्या गावरान कैऱ्या आंबट झाल्याचे अमळनेर येथील आठवडे बाजारात पाहावयास मिळाले. पूर्वीच्या काळी सर्वांच्या पसंतीला उतरलेले गावरान आंब्यांची झाडे वृक्षतोडीमुळे दृष्टीआड झाले. त्यातही थोडेफार असलेल्या झाडांचा लगडलेला मोहोर ढगाळ वातावरण व उन्हाच्या प्रखतेमुळे झडून झडून जेमतेम कैऱ्या लगडल्या.

पंधरा -वीस दिवसांपासून अधूनमधून दररोज वादळी वारा सुटत असल्याने परिपक्वते पूर्वीच फळगळती होत असल्याने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. अनेक आंबा उत्पादक ग्राहकांची लोणच्याला असलेली पसंती लक्षात घेऊन गावरान कैऱ्या आठवडे बाजारात विक्रीस आणत आहे. दरवर्षी तीनशे रुपये शेकडा मिळणाऱ्या लोणच्यासाठीच्या कैऱ्या यंदा सहाशे ते आठशे रुपये शेकडा तर प्रति चाळीस रुपये किलो प्रमाणे बाजारात विकल्या जात आहे. (latest marathi news)

mango pickle
Jalgaon Weather Update : खानदेशात मॉन्सूनचे आगमन 12 जूनच्या पुढेच होणार; आजपासून 3 दिवस वळवाचा पाऊस शक्य

परिणामी, यंदा लोणच्याची चवच महागली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा कैरी दुप्पटीने जवळपास पाच ते सहा रुपये प्रती नग झाली आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या मसाल्याचे दरही आकाशाला भिडून गरिबांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सध्या पेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरू असल्याने गृहणी पेरणीपूर्वी सर्वत्र लोणचे बनविण्यासाठी घाई करताना दिसत आहे. कैऱ्यासोबतच लोणचे साठविण्यासाठी चिनी माती व काचेच्या बरण्या खरेदी करीत आहे. कैऱ्या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने गृहिणीचा घरगुती हिशेब कोलमडला आहे. लोणच्यासाठी मीठ, मोहरी, हळद, तेल, लसून, मिरे, लवंग, मेथी, तीळ, हिंग आदी वस्तू लागत असल्याने किराणा दुकानांवरही गर्दी पाहावयास मिळते.

mango pickle
Jalgaon Lok Sabha Constituency : राजकारणात मैत्री जपत मित्राला केले आमदार, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com