Jalgaon Summer Heat : डोकेदुखी, पोटदुखीच्या रुग्णांत वाढ; कडक उन्हाचा तडाखा

Summer Heat : जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून, ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे.
Summer Heat
Summer Heatesakal

Jalgaon Summer Heat : जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून, ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) उन्हामुळे डोकेदुखी, पोटदुखी, ताप येण्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. सध्या तीव्र उष्ण वारे वाहत आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. (Increase in headache and stomach ache patients in city due to summer heat)

अति उन्हामुळे कुणाचे डोके दुखत आहे, तर कोणाला चक्कर येत आहे. डोळ्यांसमोर अंधारी येत असून, उलटीचे रुग्णही वाढले आहेत. कडक उन्हामुळे पोटदुखीचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने शरीराचा समतोल बिघडत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

हे उपाय करा...

दुपारी १२ ते ३ दरम्यान उन्हात बाहेर पडू नये. सातत्याने पाणी पीत राहावे. गॉगल, छत्री-टोपी वापरावी किंवा मोठ्या पांढऱ्या सुती रुमालाने डोके झाकावे. मेहनतीची कामे तळपत्या उन्हात करू नयेत. या काळात मद्यसेवन, चहा, कॉफी, कृत्रिम सोडावॉटर घेणे टाळावे. चांगला प्रथिनयुक्त आहार घ्यावा. शिळे अन्न खाणे टाळावे. साखर-मिठाच्या योग्य मिश्रणाचे ओरल डिहायड्रेशन सोल्यूशन ओआरएस नियमित घ्यावे. ताक, लस्सी, लिंबू सरबत घ्यावे. शिळे अन्नपदार्थ खाणे टाळावे. (latest marathi news)

Summer Heat
Jalgaon Summer Heat : सूर्यनारायण तळपले; उन्हाचे चटके असह्य

अशी आहेत उष्माघाताची लक्षणे

चक्कर येणे, उलटी, मळमळणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे, पाय दुखणे, डोके जड होणे, चेहरा लाल होणे, रक्तदाब वाढणे, अशक्तपणा, त्वचा कोरडी पडणे.

''उन्हाळ्यात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तहान नसतानाही वारंवार पाणी प्यावे, तीव्र ताप, चक्कर येणे, उलटी, मळमळणे यासारखी काही लक्षणे असल्यास तत्काळ उपचार घ्यावेत.''-डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी

Summer Heat
Jalgaon Summer Heat : तापमानवाढीचा लहान मुलांना सर्वाधिक फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com