

Insurance Fraud Case Exposed in Jalgaon Doctor Police and Wife Held
Esakal
Fake Death Claim for Insurance Busted in Maharashtra विम्याची रक्कम लुटण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमध्ये या प्रकरणी मृताच्या पत्नीसह वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांसह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यात दहिवद फाट्यावर दुचाकीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून विम्यासाठी दावा केला होता. विमा कंपनीकडून या प्रकरणी तपास केला असता सत्य उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांसह या कटात सहभागी असलेल्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.