

India's longest tunnel to be built on Jalgaon-Jalna railway line!
Sakal
जळगाव : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या प्रस्तावित जळगाव-जालना रेल्वे मार्गावर देशातील सर्वात मोठा वाहतूक बोगदा उभारला जाणार आहे. तब्बल २३.५ किलोमीटर लांबीचा हा बोगदा या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण ठरणार असून, नव्या मार्गामुळे जळगाव ते जालना हे सध्याचे ३३६ किलोमीटरचे रेल्वे अंतर थेट निम्म्यावर म्हणजेच १७४ किलोमीटरवर येणार आहे.