Queues of women in front of Mini Bank for e-KYC and 'update'.esakal
जळगाव
Ladki Bahin Yojana : पारोळ्यात लाडक्या बहीणींच्या रांगा! E-KYC सह बॅंकेतील खाते अपडेट’ करण्यासाठी गर्दी
Jalgaon News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून पात्र महिलांचे ऑनलाइन त्यानंतर ऑफलाईनही अर्ज स्वीकारण्यात आले.
पारोळा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरु झाली. सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरताना महिलांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करीत ही प्रक्रिया सोपी व सुटसुटीत केली. मात्र, अद्यापही अनेक महिलांचे बॅंक खाते अपडेट व ई- केवायसी नसल्यामुळे त्यांना रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे महिलांच्या सर्वच बॅंकांमध्ये रांगा लागत आहेत. (Ladki Bahin Yojana Queues of women in Parola)

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)