Ladki Bahin Yojna : ‘लाडक्या बहिणीं’ची ‘सेतू’बाहेर गर्दी; केंद्रचालकांकडून आर्थिक लूट

Ladki Bahin Yojna : ‘मुख्यमंत्री लाडली बहीण योजना’ अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत असल्याने लाभ मिळण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रांवर एकच गर्दी केली आहे.
Crowd at Setu Kendra outside Tehsil premises.
Crowd at Setu Kendra outside Tehsil premises.esakal
Updated on

Ladki Bahin Yojna : ‘मुख्यमंत्री लाडली बहीण योजना’ अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत असल्याने लाभ मिळण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रांवर एकच गर्दी केली आहे. गरजूंचा गैरफायदा घेत काही सेतूचालकांनी अव्वाच्या सव्वा फी आकारून मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची लूट सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक दाखले प्राप्त करण्यासाठी सेतू केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. (jalgaon Ladki Bahin Yojna crowd outside Setu last date for scheme 15 july )

दाखल्यांना वेळ लागेल म्हणून प्रत्येक जण घाई गर्दी करीत आहे. ३५ ते ४० रुपयांना मिळणारे अधिवास प्रमाणपत्र सेतूचालक पाचशे ते सहाशे रुपये सांगत आहेत. तरी देखील महिला लाभ मिळण्यासाठी वाट्टेल ते खर्च करण्यास तयार झाल्या आहेत. आपण पात्र होत नाही हे माहीत असताना देखील महिलांचा आटापिटा सुरू आहे. (latest marathi news)

Crowd at Setu Kendra outside Tehsil premises.
Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’चे धुळ्यात स्वागत! राज्य शासनाच्या योजनेबद्दल शिवसेनेतर्फे आनंदोत्सव

सेतू केंद्र उघडण्यापूर्वीच महिला केंद्राबाहेर रांगा लावून उभ्या असतात. तहसील कार्यालयालगत असणाऱ्या केंद्राबाहेर ग्राहक, त्यांच्या मोटारसायकली आणि इतर वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबा झाला होता. एकाचवेळी अनेक प्रकरणे सादर होणार असल्याने प्रशासनाची दमछाक तर होणारच आहे. मात्र वेबसाईट देखील जाम होण्याची शक्यता आहे.

''कोणत्याही ग्राहकाने ठरवून दिलेल्या फी व्यतिरिक्त जास्तीची फी देऊ नये. सेतू केंद्रचालकांनी जादाची फी मागितल्यास तत्काळ तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.''- महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, अमळनेर

Crowd at Setu Kendra outside Tehsil premises.
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहिण' बरोबरच 'लाडका भाऊ' योजना पण आणा; ठाकरेंचं सरकारला आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.