Jalgaon Lok Sabha: रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला! अक्षयतृतीयेचा मुहूर्त फळाला; पाटील होणार प्रचारात सक्रिय

Lok Sabha Election 2024 : या भेटीतून आमदार पाटील यांची नाराजी दूर होऊन ते प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सक्रिय होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे रक्षा खडसे यांना मुक्ताईनगरातूनही मताधिक्य मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
Raksha Khadse, the candidate of the BJP grand alliance, welcoming MLA Chandrakant Patil at his residence.
Raksha Khadse, the candidate of the BJP grand alliance, welcoming MLA Chandrakant Patil at his residence.esakal

मुक्ताईनगर : लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजप महायुतीच्या प्रचारापासून दूर असलेले येथील आमदार चंद्रकांत पाटील यांची भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी शुक्रवारी (ता. १०) त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीतून आमदार पाटील यांची नाराजी दूर होऊन ते प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सक्रिय होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे रक्षा खडसे यांना मुक्ताईनगरातूनही मताधिक्य मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे. (Jalgaon Lok Sabha 2024 Raksha Khadse met MLA Chandrakant Patil)

आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी स्वत: श्रीमती खडसे आमदार पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. या प्रसंगी दोन्ही मान्यवरांनी मनोममीलन करत आगामी निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे संकेत दिलेत. मुक्ताईनगरचे खडसे कुटुंबीय आणि आमदार पाटील यांचे अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. त्यामुळे आमदार पाटील महायुतीतील घटक पक्षाचे सदस्य असले, तरी ते रक्षा खडसे यांच्या प्रचारापासून दूर होते.

पालकमंत्र्यांची मध्यस्थी

गुरुवारी (ता. ९) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी आमदार पाटील यांनी प्रचारात सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले होते. रक्षाताई आमदार पाटील यांच्या घरी भेट देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते.

या अनुषंगाने शुक्रवारी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रक्षा खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. श्री. पाटील कुटुंबातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर दोन्ही मान्यवरांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली. (Latest Marathi News)

Raksha Khadse, the candidate of the BJP grand alliance, welcoming MLA Chandrakant Patil at his residence.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांची जुगलबंदी! टोलेबाजीमुळे चर्चा

भाजपचे लोकसभाप्रमुख नंदू महाजन, शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, अफसर खान आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या भेटीनंतर आमदार चंद्रकांत पाटील आता रक्षाताई खडसे यांच्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सक्रिय होतील, असे स्पष्ट झाले आहे.

बावनकुळे यांची शिष्टाई

दरम्यानच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती, तसेच दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Raksha Khadse, the candidate of the BJP grand alliance, welcoming MLA Chandrakant Patil at his residence.
Lok Sabha Election: 'त्या' रात्री PDCC बँक सुरू ठेवणं मॅनेजरला भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली मोठी अ‍ॅक्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com