Lok Sabha Election: 'त्या' रात्री PDCC बँक सुरू ठेवणं मॅनेजरला भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली मोठी अ‍ॅक्शन

Lok Sabha Election: बारामती लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डीसीसी बँक सुरू ठेवणं बँक मॅनेजरला पडलं महागात, निवडणूक आयोगाने केली निलंबनाची कारवाई
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेतील (PDCC Bank Pune) बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यासाठी बँक मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवल्याचा आरोप बँकेवर करण्यात आला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंबधीची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.

रोहित पवारांच्या तक्रारीची दखल घेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बारामती मतदारसंघात येणाऱ्या भोर तालूक्यातील वेल्हे मधील बँकेची शाखा मतदानाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता.

Lok Sabha Election
Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

त्याचबरोबर रोहित पवारांनी यासंबधीची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्यामुळे आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lok Sabha Election
NDA Pune: पुण्यातील एनडीए परिसरात सापडला बॉम्ब

या घटनेबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर बँकेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले होते. त्यात काही लोक शाखा व्यस्थापकाच्या केबिनमध्ये आत-बाहेर करत असल्याचे आढळले आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com