Jalgaon Lok Sabha Code of Conduct : सी-व्हिजील ॲपवर 34 तक्रारी, 5 शस्त्र परवाने जप्त!

Jalgaon News : जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे.
C Vigil App
C Vigil Appesakal

Jalgaon Lok Sabha Code of Conduct : जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे. शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्वरुपाच्या उपाययोजना केल्या जात असून, कारवाईचा बडगा उगारला जात आहे. (Jalgaon Lok Sabha Code of Conduct 34 complaints on C Vigil app)

गेल्या आठवड्यात जळगाव शहरासह दोन्ही लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी फलक, बॅनर, पोस्टर्स काढण्यात आले. विविध पक्षांच्या चिन्हांसह, लोकप्रतिनिधी, नेत्यांची नावे असलेल्या भिंती झाकण्यात आल्या. जिल्ह्यात एकूण १२४६ परवानाधारक शस्त्र आहेत.

ही शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्यानंतर आतापर्यंत ५ विनापरवाना शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमांतर्गत १ हजार ७३ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. सीआरपीसीअंतर्गत आतापर्यंत ७८६ जणांना अटक करण्यात आली आहे.

दारूबंदी

आचासंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७८ गुन्हे नोंदविले आहेत. ३३ हजार ५०६ लिटर अवेध दारू जप्त करण्यात आली. ११ लाख ६९ हजार ८२५ रूपयांचा हा मुद्देमाल आहे. (latest marathi news)

C Vigil App
Jalgaon News : बोदवड सिंचन योजनेच्या पंपगृहाचा स्लॅब कोसळला! ठेकेदाराच्या चौकशीची मागणी

सार्वजनिक तक्रार निवारण

व्होटर हेल्पलाइनद्वारे प्राप्त झालेल्या ५३ कॉलचे समाधान करण्यात आले आहे. ते कॉल निकाली काढण्यात आले आहेत. वोटर हेल्पलाइनवर प्राप्त होणाऱ्या कॉल्सपैकी बहुतांश तक्रारी या मतदान कार्ड न मिळाल्याबाबत असल्याने कॉल करणाऱ्या नागरिकांना संबंधित निवडणूक अधिकारी तसेच तहसील कार्यालयांशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे. सी-व्हिजील अर्जाद्वारे ३४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एन्कोर ॲपअंतर्गत परवानग्यांसाठी १ अर्ज प्राप्त झाला होता. तथापि, अर्जासंदर्भात त्रुटी पूर्तता करण्यास सूचित करण्यात आले आहे.

C Vigil App
Jalgaon News : वरणगाव पालिका कार्यालयाचे स्थलांतर! लवकरच नवीन इमारतीतून चालणार कारभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com