Crowd of candidates for retreat on Monday at Collectorate office.
Crowd of candidates for retreat on Monday at Collectorate office.esakal

Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 14, रावेर मतदारसंघात 24 उमेदवार; माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघातून सहा, तर रावेर लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी माघार घेतली.

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघातून सहा, तर रावेर लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात एका जागेसाठी १४, तर रावेर लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात आहेत. (Jalgaon Lok Sabha Constituency 14 candidates in Jalgaon 24 candidates in Raver)

दुपारी तीननंतर रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. माघारीनंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. २६ एप्रिलला छाननीत जळगावमध्ये चार, तर रावेर लोकसभा मतदारसंघात दोन, असे एकूण सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. जळगावात २०, तर रावेरमध्ये २९ उमेदवार रिंगणात होते.

अपक्षांनी माघार घ्यावी, यासाठी पक्षाचे पदाधिकारी दोन दिवसांपासून अपक्ष उमेदवारांशी सल्लामसलत करीत होते. असे असतानाही दोन्ही मतदारसंघ मिळून ११ उमेदवारांनी माघार घेतली.

रावेरला दोन यंत्रे लागणार

एका लोकसभेसाठी मतदान यंत्रात (बॅलेट युनिट) १५ उमेदवारांचे व एक ‘नोटा’, असे १६ बटन असतात. जळगाव लोकसभेसाठी २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहे. मतदारसंघात एकच मतदान यंत्र लागेल. रावेर मतदारसंघात २९ उमेदवार रिंगणात होते.

त्यातील पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात २४ उमेदवार आहेत. एका मतदान यंत्रात १६ बटन असतात. १५ पेक्षा अधिक उमेदवार झाल्याने रावेर मतदारसंघात दोन मतदान यंत्र (बीयू) लागतील. (Latest Marathi News)

Crowd of candidates for retreat on Monday at Collectorate office.
Jalgaon News : ‘त्या’ पाचशेवर ॲप्रेंटिसधारकांना मिळाला न्याय! रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त

रिंगणातील उमेदवार व कंसात पक्षाची नावे

जळगाव लोकसभा : करण बाळासाहेब पाटील-पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ), विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी), स्मिता उदय वाघ (भारतीय जनता पक्ष), माजी हवालदार ईश्वर दयाराम मोरे (सैनिक समाज पार्टी), नामदेव पांडुरंग कोळी (अपक्ष).

युवराज भीमराव जाधव (वंचित बहुजन आघाडी), अब्दुल शकूर देशपांडे, अहमद खान युसूफ खान, करण पवार, संदीप युवराज पाटील, महेंद्र देवराम कोळी, मुकेश मूलचंद कोळी, ललित गौरीशंकर शर्मा व ॲड. बाबूराव तुकाराम दाणेज (सर्व अपक्ष).

रावेर लोकसभा : रक्षा निखिल खडसे (भारतीय जनता पक्ष), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), अशोक बाबूराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडित ब्राह्मणे (वंचित बहुजन अघाडी), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल).

अनिल पितांबर वाघ, अमित हरिभाऊ कोलते, प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव, एकनाथ नागो साळुंके, कोमलबाई बापूराव पाटील, जितेंद्र पांडुरंग पाटील, प्रवीण लक्ष्मण पाटील, भिवराज रामदास रायसिंगे, ममता ऊर्फ मुमताज भिकारी तडवी, युवराज देवसिंग बारेला, डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते, श्रीराम ओंकार पाटील, श्रीराम सीताराम पाटील, शेख आबिद शेख बशीर, सागर प्रभाकर पाटील, संजय प्रल्हाद कांडेलकर (सर्व अपक्ष).

Crowd of candidates for retreat on Monday at Collectorate office.
Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com