Jalgaon Lok Sabha Constituency : स्थानिक मतभेद विसरुन जोमाने कामाला लागा : चंद्रशेखर बावनकुळे

Lok Sabha Constituency : मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी आयोजित भाजपसह महायुतीच्या घटकपक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankuleesakal

Jalgaon Lok Sabha Constituency : स्थानिक वाद मिटवून विकसित भारतासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारात सहभागी होऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी आयोजित भाजपसह महायुतीच्या घटकपक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. (Jalgaon Lok Sabha Constituency chandrashekhar bawankule at Grand Alliance meeting )

व्यासपीठावर उमेदवार रक्षा खडसे यांच्यासह प्रदेश मंत्री विजय चौधरी, डॉ. राजेंद्र फडके, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, भुसावळचे आ. संजय सावकारे, माजी आमदार नैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील, प्रफुल्ल जवरे, मनोज बियाणी, उमेश नेमाडे, गोविंद अग्रवाल आदी उपस्थित होते. (latest marathi news)

Chandrasekhar Bawankule
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेतील प्रचाराच्या बदल्यात विधानसभेचे ‘कमिटमेंट’!

श्री. बावनकुळे यांनी महायुती मधील सर्व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, आढावा घेतला. तसेच समस्या जाणून घेऊन, नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी महायुती उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. 

Chandrasekhar Bawankule
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘मोदी टू बूथ’ अभियानाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचतोय! अमोल जावळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com