Jalgaon Lok Sabha Constituency : महाजनांनी मानली हार, पण शेवटच्या पेट्यांनी घातला ‘हार’!

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघाची सन १९८९ ची निवडणूक ही महत्वाची ठरली होती. त्यावेळी खासदार वाय.एस.महाजन यांना तिसऱ्यांदा कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती.
Vote Counting Ballot Paper, Congress
Vote Counting Ballot Paper, Congressesakal

Jalgaon News : सन १९८९ मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असतांना कॉंग्रेसचे उमेदवार प्रा. वाय. एस. महाजन हे भाजपचे उमेदवार डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्यापेक्षा पिछाडीवर पडले, त्यावेळी आपला पराभव मान्य करून महाजन हे मतमोजणी केंद्रांतून निघून गेले. परंतु शेवटच्या मतपेट्यांच्या मतमोजणीत निकाल फिरला अन् अवघ्या पाच हजार मतांनी कॉंग्रेसचे महाजन विजयी झाले. कॉंग्रेस एस चे उमेदवार सुरेशदादा जैन यांनाही दोन्ही उमेदवारांच्या जवळपास तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. (Jalgaon Lok Sabha Constituency)

जळगाव लोकसभा मतदारसंघाची सन १९८९ ची निवडणूक ही महत्वाची ठरली होती. त्यावेळी खासदार वाय. एस. महाजन यांना तिसऱ्यांदा कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. भारतीय जनता पक्षाने रावेरचे तत्कालिन आमदार गुणवंतराव सरोदे यांना उमेदवारी दिली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस एस.पक्षातर्फे जळगावचे तत्कालिन आमदार सुरेशदादा जैन यांनीही निवडणूक लढविली होती.

जळगाव लोकसभा मतदारसंघात ही अत्यंत चुरशीची तिरंगी लढत झाली होती. तिन्ही उमेदवाराकडून प्रचाराची जोरदार रणधुमाळी झाली होती. जळगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या सुरेशदादा जैन यांच्या उमेदवारीमुळे या निवडणूकीत जोरदार रंगत आली होती.

निसटत्या विजयाचा टर्निंग पॉंईट

निवडणूक जोरदार रंगात आलेली असतांना मतदानाच्या दोन दिवस अगोदर कॉंग्रेसचे उमेदवार वाय. एस. महाजन यांची तब्येत अधिकच खालावल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे कॉंग्रेस पक्षही हादरला. त्यावेळी मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून पक्षातर्फे उघड्या जीपमधून वाय.एस.महाजन यांना फिरविण्यात आले. त्यांनीही जनतेला अभिवादन करून आपली तब्येत चांगली असल्याचे दाखवून दिले. तेव्हा त्यांच्या तब्येतीबाबतची चर्चा थांबली .ही रॅली कॉंग्रेसच्या निसटत्या विजयाचा टर्निंग पॉंईट ठरला. (Jalgaon Politics)

Vote Counting Ballot Paper, Congress
Solapur Loksabha Constituency : दीडशे सराईत गुन्हेगार तडीपारच्या यादीत ; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कारवाई

महाजनांची पिछाडी अन् केंद्र सोडले

निवडणूकीच्या मतमोजणीच्यावेळी कॉंग्रेसचे वाय. एस. महाजन हे भाजपचे डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्यापेक्षा पिछाडीवर होते. प्रारंभी सर्वच फेऱ्यात ते पिछाडीवर असल्यामुळे महाजन यांनी पराभव झाल्याचे मान्य करीत मतदान केंद्र सोडून निघून गेले होते. मात्र मतपेट्यांच्या शेवटच्या फेऱ्यात संपूर्ण निवडणूकीचा कलच पालटला.

सर्व पिछाडी भरून काढून महाजन हे भाजपच्या सरोदे यांच्यावर मात करीत पाच हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांची जळगावातून मिरवणूक काढली होती. त्यांनी आपल्या खासदारकीची हॅटट्रीक केली होती.

सुरेशदादा जैन यांनाही बरोबरीची मते

कॉंग्रेस एस.चे उमेदवार सुरेशदादा जैन यांनीही कॉंग्रेस व भाजपच्या उमेदवाराच्या बरोबरीची मते घेतली होती. कॉंग्रेसचे वाय.एस.महाजन यांना २ लाख ८ हजार ९९२ मते मिळाली, भाजपचे गुणवंतराव सरोदे यांना २ लाख ३ हजार ५५६ मते तर कॉंग्रेस एस.चे सुरेशदादा जैन यांना १ लाख ७३ हजार ७१२ मते मिळाली होती. जैन यांचा ३५हजार मतांनी पराभव झाला होता.

Vote Counting Ballot Paper, Congress
Jalgaon Lok Sabha Code of Conduct : सी-व्हिजील ॲपवर 34 तक्रारी, 5 शस्त्र परवाने जप्त!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com