Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभेत भाजपचे पारडे जड; पण उमेदवार कोण?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरु होण्यास अवघ्या काहीच दिवसांचा आता अवधी आहे. सोशल मीडियावर सध्या विविध सर्व्हे सुरू आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal

Jalgaon News : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरु होण्यास अवघ्या काहीच दिवसांचा आता अवधी आहे. सोशल मीडियावर सध्या विविध सर्व्हे सुरू आहेत. त्यात भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे भाजपची दमछाक होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर त्यात आता चर्चा सुरु झालीय ती रावेर लोकसभेची. रावेर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. (Jalgaon Lok Sabha election 2024 all opposition parties are united against BJP in Raver Lok Sabha)

त्यामुळे विद्यमान खासदार रक्षा खडसे असे आजचे चित्र असले तरी पक्ष त्यांना तिकिट देईल का, इथपासून चर्चा सुरू आहेत. तर महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाली तर सासरे विरुद्ध सून यांच्यात थेट लढत पहावयास मिळणार आहे. राज्यातील संपूर्ण राजकीय समीकरण सध्या बदललेले आहे.

भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती असून, दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी, उध्दव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांची महाविकास आघाडी आहे. पण, जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार, अजित पवार) या पक्षांची सध्या एकमेकांवर जोरदार टीका सुरू असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात रावेर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
Jalgaon News : संस्कारांचं पावित्र्य, शाही सोहळ्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न : लिना पाटील

जास्त जागा मिळविण्यावर भर

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानुसार कुठल्याही परिस्थितीत भाजपला संपूर्ण भारतात जास्तीतजास्त जागा मिळवण्यावर भर आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासन शरद पवार यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच दिले असले तरी या मतदारसंघात काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत आला आहे.

त्यातच गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवणारे डॉ.उल्हास पाटील यांनी कन्या डॉ.केतकी पाटीलसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे युवा पिढी म्हणून डॉ. केतकी पाटील यांचा देखील उमेदवारी मिळावी, याकडे प्रयास असणार आहे.

तर माजी आमदार दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे देखील सध्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याने एकंदरीत रावेर लोकसभेत भाजपचे पारडे जड वाटत असले तरी उमेदवारी कोणाला जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Lok Sabha Election 2024
Jalgaon Lok Sabha Election : आता ‘बेड’वरील ज्येष्ठांना पोस्टल मतदानाचा पर्याय; हेळसांड थांबणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com