Jalgaon Lok Sabha Constituency: केंद्र सरकारसह खासदारांचे काम उत्तम; बदलण्याची वेळ का यावी? मतदारसंघात दोन्ही गटांसमोर समस्या

Political News : निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे समर्थक केंद्र व मोदी सरकारच्या कामगिरीचा मुद्दा पुढे करीत आहेत.
Unmesh Patil
Unmesh Patilesakal

Jalgaon Loksabha Constituency 2024 : निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे समर्थक केंद्र व मोदी सरकारच्या कामगिरीचा मुद्दा पुढे करीत आहेत. तर प्रतिस्पर्धी शिवसेना ‘उबाठा’च्या कार्यकर्त्यांकडून स्थानिक मुद्यांवरुन प्रश्‍न विचारले जात आहेत. मुळात केंद्र सरकारची कामगिरी चांगली असेल तर उमेदवार बदलाची वेळ भाजपवर का यावी? आणि खासदार म्हणून उन्मेश पाटलांचे काम चांगले असेल तर त्यांना उमेदवारी का मिळाली नाही असा प्रश्‍न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातील वातावरण याच मुद्यांवरुन तापत आहे. (Jalgaon Lok Sabha cnstituency election 2024 marathi news)

जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. विद्यमान खासदार उन्मेश पाटलांना भाजपने उमेदवारी नाकारुन माजी आमदार स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले. उन्मेश पाटलांच्या हा प्रकार चांगलाच जिव्हारी लागला. उमेदवारी कापल्यानंतर आठवडाभर ‘आपण भाजपसोबतच आहोत’ असा दावा करणाऱ्या उन्मेश पाटलांनी पक्षालाच आव्हान देत शिवसेना ‘उबाठा’त प्रवेश केला.

विशेष म्हणजे, ते एकटे गेले नाहीत; तर त्यांनी पारोळ्याची माजी नगराध्यक्ष व त्यांचे जवळचे मित्र करण पवार यांनाही सोबत नेले. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवरच त्यांचा प्रवेश सोहळा झाला. विशेष म्हणजे, स्वत: उन्मेश पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारीस नकार देत करण पवारांना उमेदवारी देण्याची शिफारस केली व त्यानुसार ‘उबाठा’कडून पवार उमेदवार झाले.

प्रचारादरम्यान होतेय अडचण

आता एकीकडे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आहेत. तर दुसरीकडे भाजपमधूनच ‘उबाठा’त प्रवेश केलेले करण पवार एक युवा नेता म्हणून प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरु झाल्यानंतर दोन्ही गटांच्या उमेदवारांनी प्रचारात गती धरली आहे. मात्र, प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांची चांगलीच अडचण होत आहे. (Jalgaon Political News)

Unmesh Patil
Pune Lok Sabha: पुण्यातील ४२ गुंड तडीपार; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तांची मोठी कारवाई

भाजपसमोरील अडचण

भाजपचे उमेदवार, नेते व कार्यकर्ते प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या चांगल्या कामगिरीचा दावा करताना दिसत आहेत. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना, प्रकल्प, समाजातील सर्व घटकांतील लोकांना दिलेला न्याय, विकास आणि प्रगतीचे दाखले भाजपकडून दिले जात आहेत.

मात्र, या योजना व कामे इतकी प्रभावी आहेत, मोदींची कामगिरी सरस आहे मग भाजपवर जळगावचा उमेदवार बदलण्याची वेळ का आली? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आणि हीच खरी प्रचारात उतरलेल्या कार्यकर्त्यांसमोरची अडचण आहे.

‘उबाठा’समोरील समस्या

शिवसेना ‘उबाठा’चे उमेदवार करण पवार आहेत. पारोळ्याबाहेर त्यांचा मित्रपरिवार व सगेसोयरे जास्त असले तरी पारोळ्याचे स्थानिक असल्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघात संपर्क नाही. शिवाय, करण पवारांसाठी मैदानात उतरलेत ते उन्मेश पाटील. ‘उबाठा’त प्रवेश करण्यापूर्वी भाजपत असताना उन्मेश पाटील मोदींच्या नेतृत्वाची व केंद्र सरकारच्या कामगिरीची स्तुती करताना थकत नव्हते.

एका रात्रीतून त्यांची उमेदवारी कापली गेली आणि ते भाजपच्या विरोधात उभे ठाकले. जर मोदी सरकारची कामगिरी चांगली होती, खासदार म्हणून काम प्रभावी होते, मग भाजपने उमेदवारी का नाकारली? आणि भाजपने तिकीट दिले नाही तर ‘उबाठा’कडून स्वत: उमेदवारी का केली नाही? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक उन्मेश पाटलांना व त्यांच्या समर्थकांनाही विचारत आहेत. आणि इथेच खरी त्यांचीही कोंडी होत आहे. (Jalgaon Political News)

Unmesh Patil
Jalgaon Lok Sabha Election 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून 2 दिवस गर्दी! 25 पर्यंतच मुदत

नेत्यांसमोरील पेच वेगळाच!

जळगाव मतदारसंघात अशाप्रकारे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची अडचण होत असताना नेत्यांसमोरील पेच वेगळाच आहे. उन्मेश पाटलांवर टीका करताना गिरीश महाजन आपणच त्यांना विधानसभा, लोकसभेची उमेदवारी मिळवून देत आमदार, खासदार केल्याचा दावा करतात. आणि त्यांच्या चुकाही निदर्शनास आणून देतात.

उन्मेश पाटलांनी जर चुका केल्या असतील तर उमेदवारी देताना महाजनांची निवड चुकली का हा प्रश्‍न उपस्थित होतो. तर आतापर्यंत महाजनांना नेता, भाग्यविधाता समजणारे उन्मेश पाटील उमेदवारी नाकारल्यानंतर थेट ‘उबाठा’त जातात व महाजनांवरच टीका करतात. मग पाटलांचीही नेता निवड चुकली का असाही प्रश्‍न उपस्थित होण्यास वाव आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधात उभ्या ठाकलेल्या या नेत्यांसमोरही अशा प्रकारच्या मुद्यांची उत्तरे देण्याचा पेच आहेच.

Unmesh Patil
Nashik Lok Sabha Election : निवडणूक प्रशिक्षणास दांडी! जिल्ह्यात 52 निरीक्षकांना नोटिसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com