Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या उंचावलेल्या प्रतिमेसह मोदींच्या विकासकामांना कौल

Lok Sabha Election : भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेली प्रतिमा याकडे पाहून मतदारांनी भाजपच्या उमेदवारास कौल दिला आहे.
Smita Wagh
Smita Waghesakal

Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : जळगाव लोकसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांनी सुमारे अडीच लाखांच्या मतांनी निवडून आल्या. भारतीय पक्षाचे ग्राउंड रुटवर असलेले कार्यकर्त्यांचे संघटन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेली प्रतिमा याकडे पाहून मतदारांनी भाजपच्या उमेदवारास कौल दिला आहे. ( Modi development works with raised image of country )

लोकसभा मतदार संघासाठी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी यांना जाहीर केल्यानंतर त्यांनी त्याच दिवसापासून मतदारसंघातील विविध पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना, समाजातील प्रतिष्ठीतांना भेटणे सुरू केले होते. त्यांचे तिकीट ऐनवेळी कापले जाईल अशी अफवाही विरोधकांनी पसरविली होती. तरीही त्या मतदारांच्या भेटीगाठीवर ठाम होत्या.

भाजपने दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती त्यांना दिली. मोदींमुळे झालेल्या विकासकामांची जंत्री त्यांनी मतदारांसमोर ठेवली. मोदीचा विकास डोळ्यांनी दिसणारा असल्याने मतदारांना तो भावला. स्मिता यांच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्या. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात जाण्याचा स्मिता वाघ यांचा फंडा यशस्वी ठरला.

त्यांच्या विजयासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही मदत केली. सोबत मोदींनी केलेला विकास मतदारांना दिसला म्हणूनच भाजपच्या वाघ यांचा विजय झाला असे म्हटल्यास वावगे ठरले नाही. (latest marathi news)

Smita Wagh
Lok Sabha Elections 2024 Results Live Update: विद्यमान खासदारांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता...

भाजपचे माजी खासदार उन्मेश पाटील हे २०१९ च्या निवडणूकीत ४ लाख ११ हजार ६१७ मतांनी विजयी झाले होते. खासदार पाटील यांना ७ लाख १३ हजार ८७४ मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी उमेदवार गुलाबराव देवकर (एनसीपी) यांना ३ लाख २ हजार २५७ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणूकीत मोदींची लाट असल्याने अधिक मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत स्मिता वाघ यांना सुमारे ६ लाख ६२ हजार ५७९ मते मिळाली.

तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील-पवार यांना सुमारे ४ लाख १५ हजार ४६५ मते मिळाली. वाघ यांनी सुमारे २ लाख ४७ हजार ११४ मतांनी पवार यांचा पराभव केला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार करण पाटील-पवार यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. माजी खासदार उन्मेष पाटील, ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी यांनीही प्रचारात जोर लावला होता.

मात्र विजयश्री त्यांना खेचून आणता आली नाही. वाढती महागाई, शेतीला न मिळालेला हमी भाव हे मुद्दे मतदारांपर्यंत पोचविण्यात ते कमी पडल्याचे दिसून आले. दोन विशिष्ट समाजाला उमेदवार पाटील यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न निवडणूकीत झाला. मात्र तो फॅक्टरही पाटील यांच्या विजयासाठी प्रभावी ठरू शकला नाही.

Smita Wagh
Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : भाजपने जळगाव जिल्ह्याचा गड राखला! रावेरला रक्षा खडसेंची हॅटट्रिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com