Licensing Officer
Licensing Officer esakal

Jalgaon Lok Sabha Election News : निवडणुकीत विविध परवान्यांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Jalgaon Lok Sabha Election News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवारांना परवानगी घेताना परवानगी देणारे अधिकारी कोण आहेत, हे कळावे म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी देणारे अधिकारी यांची नावे जाहीर केली आहेत. (Jalgaon Appointment of officers for various licenses in elections)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात प्रचार तथा निवडणुकी संबंधित विविध बाबी करिता विविध परवानग्या घेणे आवश्यक असते. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यामुळे परवानगी देण्याच्या कामकाजात सुसूत्रता येणार आहे.

सभासांठी पोलिस ठाणे

जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्यामार्फतच परवानगी मिळणार आहे. मिरवणूक,पदयात्रा, रॅली,प्रचार फेरी,रोड शो याकरिता संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हे परवानगी अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

पोर्स्टर्ससाठी नगरपालिका

पोस्टर्स झेंडे कापडी बॅनर सभेच्या ठिकाणी लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था,महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल. खासगी जागेवर फलक व प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल. (latest marathi news)

Licensing Officer
Jalgaon Lok Sabha Election : ‘रावेर’च्या मैदानात खडसेंविरुद्ध डॉ. पाटील यांची तयारी

एक खिडकी योजना..

प्रचार वाहनाच्या परवानगीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजना, रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजनाही परवानगी देतील.

राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना प्रचार वाहन परवानगीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव हे परवानगी देणारी अधिकारी असतील. उमेदवाराच्या तात्पुरते प्रचार कार्यालय उघडण्यासाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी परवानगी देतील.

हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवणे करिता अप्पर जिल्हा दंडाधिकारी हे परवानगी अधिकारी असतील. ध्वनीक्षेपकाची परवानगी देण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख अधिकारी हे परवानगी देतील. विविध शाळांच्या मैदानावर सभा घेण्याकरिता ना हरकत दाखला उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून मिळेल.

Licensing Officer
Jalgaon News : फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल

सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसेच प्रिंट मीडियावर (मतदानाच्या पूर्वीचे शेवटचे ४८ तास ) प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती तसेच बल्क मेसेजेस यांच्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी परवानगी अधिकारी असतील.

फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर, पोस्टर व इतर प्रचार साहित्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत परवानगी मिळेल. उमेदवार, विविध राजकीय पक्षांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी suvidha candidate App किंवा ENCORE या वेब पोर्टल द्वारे अर्ज सादर करता येतील.

Licensing Officer
Jalgaon Lok Sabha Election : भाजपचा बालेकिल्ला फोडण्याचे शिवसेना ठाकरे गटासमोर आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com