Nationalist Congress Sharad Pawar faction's candidate from Raver constituency Sriram Patil with party state president Jayant Patil.
Nationalist Congress Sharad Pawar faction's candidate from Raver constituency Sriram Patil with party state president Jayant Patil.esakal

Jalgaon Lok Sabha Election : संतोष चौधरी हे शरद पवारांना नक्की साथ देतील : जयंत पाटील

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज अचानक जळगाव येथे विमानाने आले अन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निघूनही गेले.

Jalgaon Lok Sabha Election : माजी आमदार संतोष चौधरी हे अनेक वर्षांपासून शरद पवारांबरोबर काम करीत आहेत. त्यामुळे या लढाईतही ते नाराज न राहता शरद पवारांना निश्‍चित साथ देतील, याबाबत आपल्याला विश्‍वास आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज अचानक जळगाव येथे विमानाने आले अन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निघूनही गेले. (Jalgaon Lok Sabha Election Jayant Patil statement of Santosh Chaudhary will definitely support Sharad Pawar marathi news )

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार रविवारी (ता. २१) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत; परंतु प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा जळगाव जिल्ह्यात कोणताही दौरा नव्हता, मात्र ते शनिवारी (ता. २०) सकाळी विमानाने जळगाव येथे दाखल झाले. हॉटेल मैत्रेय येथे त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अरुण गुजराथी, माजी आमदार अरुण पाटील, वाल्मीक पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार आदींनी त्यांची भेट घेतली. चार तासांच्या बैठकीनंतर ते विमानाने दुपारीच मुंबईला रवाना झाले. (latest marathi news)

Nationalist Congress Sharad Pawar faction's candidate from Raver constituency Sriram Patil with party state president Jayant Patil.
Jalgaon Lok Sabha Election : प्रा. मनोज पाटील यांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढणार

रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराबाबत त्यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाबाबतही चर्चा केली. त्यांनी अडचणीही समजून घेतल्याचे सांगण्यात आले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आपण रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या विजयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आम्हाला यश मिळेल, असा आपल्याला विश्‍वास आहे.

चौधरी हे पवारांना साथ देतील

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराज आहेत. त्यांनी बंडखोरी करण्याची घोषणा केली आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, की संतोष चौधरी गेली अनेक वर्षे शरद पवार यांच्या विचाराने कार्य करीत आहेत. त्यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यामुळे ते शरद पवारांची साथ सोडणार नाहीत. या लढाईत ते पवारांना साथ देतील, असा विश्‍वास आहे. शनिवारच्या बैठकीला संतोष चौधरींनाही पाचारण करण्यात आले होते; परंतु मतदारसंघात लग्न असल्याने आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

तक्रारी केल्या दूर

प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारीही केल्या होत्या. चोपडा व मुक्ताईनगर तालुक्यातील तक्रारी होत्या. त्याबाबत पाटील यांनी संबधितांना त्या दुरुस्त करण्याचा आदेशही दिल्याचे सांगण्यात आले.

Nationalist Congress Sharad Pawar faction's candidate from Raver constituency Sriram Patil with party state president Jayant Patil.
Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात 42 उमेदवारांनी नेले 106 उमेदवारी अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com