A. T. Nana Patil, Karan Pawar
A. T. Nana Patil, Karan Pawar esakal

Jalgaon Lok Sabha Election News : महाविकास आघाडीसमोर पारोळ्यातून आव्हान देण्यासाठी भाजपकडून चाचपणी

Jalgaon News : करण पवारांना ए. टी. नाना पाटील यांच्या रूपाने पारोळ्यातूनच आव्हान देण्याची चाचपणी भाजपकडून करण्यात येत असल्याचे राजकीय गोटात चर्चा आहे.

भडगाव : भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत हातात शिवबंधन बांधल्याने जळगाव लोकसभेची भाजपला सोपी वाटणारी जागा 'डेन्जर झोन' मध्ये गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे करण पवारांना ए. टी. नाना पाटील यांच्या रूपाने पारोळ्यातूनच आव्हान देण्याची चाचपणी भाजपकडून करण्यात येत असल्याचे राजकीय गोटात चर्चा आहे. कारण करण पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना मिळणारा प्रतिसाद हे भाजपच्या लक्षात आल्याचेच द्योतक मानले जात आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

भाजपचे विद्यमान खासदार असताना उन्मेश पाटील यांचे भाजपने तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघांना तिकीट दिले. मात्र नाराज झालेले उन्मेश पाटलांनी भाजपला जय श्रीराम करत आपल्या हातात उध्दव ठाकरेंच्या हाताने शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी ही प्रवेश केला.

उन्मेश पाटीलांनीही स्वत: उमेदवारी न घेता मित्र असलेल्या करण पवारांना उमेदवारी द्यायला सांगीतले. करण पवारांना निवडून आणण्याची शपथ उन्मेश पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपसमोर आव्हानाचा डोंगर उभा राहिल्याचे मान्य करावा लागेल.

भाजप समोर तगडे आव्हान

भाजपने स्मिता वाघांना तिकीट जाहीर केल्यावर महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवारांची उणीव होती. त्यांनी सुरवातीला स्मिता वाघांना अमळनेरमधूनच ललिता पाटील यांचा प्रवेश करून आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना ठाकरे गट तगडा उमेदवाराच्या शोधात होते. त्यांनी उमेदवारी जाहीर करण्याची घाई केली नाही.

त्यानंतर भाजपात नाराज असलेल्या उन्मेश पाटील यांना त्यांनी गळाला लावले. त्यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश करीत मित्र असलेल्या करण पवारांसाठी उमेदवारी मिळविली. करण पवारांना महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्याने भाजपला प्रारंभी अगदी सोपी वाटणारी जागा अटीतटीत गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप नव्याने डाव आखण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.(jalgaon political news)

A. T. Nana Patil, Karan Pawar
Satara Loksabha Constituency : सातारा लोकसभेची जागा सोडणार नाही ; शरद पवार

भाजप पारोळ्यातूनच आव्हान देणार?

करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघात तयारी केली असल्याने त्यांचा पारोळा, एरंडोल, भडगावात चांगला जनसंपर्क आहे. तर चाळीसगावातून उन्मेश पाटील हे त्यांच्यामागे मोठी ताकद उभी करू शकतात. तर जळगाव शहरात त्यांचा असलेला मित्र परिवार, ठाकरे गटाची असलेली ताकद त्यांना बळ देणारी आहे.

शिवाय महाविकास आघाडीचे मित्र पक्ष व काका माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील यांचे पाठबळ त्यांना ताकद देणारे ठरू शकते. करण पवारांच्या या जमेच्या बाजू पाहता त्यांना पारोळ्यातूनच आव्हान उभे करण्याचे आखाडे भाजपकडून बांधले जात असल्याचे बोलले जात आहे. दहा वर्ष खासदार असलेले ए.टी.नाना पाटील यांना उमेदवारी देण्याची चाचपणी केली जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

ए.टी.पाटील हे मुळ पारोळ्याचे आहेत. ते पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते दहा वर्ष खासदार होते, त्यामुळे मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. चाळीसगाव तालुक्यात त्यांची सासरवाडी असल्याने तेथे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एक साधा राजकारणी म्हणून त्यांची जनमानसात स्वच्छ प्रतिमा आहे. त्यामुळेच ए.टी.पाटील हेच महाविकास आघाडीला आव्हान देऊ शकतात असे बोलले जात आहे. त्याअनुषंगानेच काल संकटमोचक गिरीश महाजन आणि ए.टी.पाटील यांच्यात बंददाराआड चर्चा झाल्याचे सांगीतले जात आहे.

A. T. Nana Patil, Karan Pawar
Kalyan Loksabha: भाजपने पुन्हा वाढवला श्रीकांत शिंदेंचा ताप; ..तर एकही कार्यकर्ता काम करणार नाही

महाजन आणि चव्हांणांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव लोकसभेची जागा राखण्याचे आव्हान गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोर आहे. मंगेश चव्हांणांना स्वत:च्या चाळीसगावातच उन्मेश पाटलांना सामोरे जावे लागणार आहे.

त्यामुळे ते नव्याने उमेदवाराची चाचपणी करू शकतात असा अंदाज बांधला जात आहे. विशेषत: मंगेश चव्हांणांसाठी जळगावची जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे ते ताकही फुंकून पिऊ शकतात हे सर्वश्रृत आहे.

भाजपसाठी दुसरी बाजू....

दरम्यान भाजपासमोर उमेदवारी बदलवणे तेवढेही सोपे नाही. कारण गेल्या निवडणुकीत स्मिता वाघांची जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळेस रद्द करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा एका महिला उमेदवाराचे तिकीट कापणे भाजपसाठी अवघड आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे भाजपने उमेदवार बदलला अशी नामुष्की ओढावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला उमेदवार बदलवितांना खुप ‘सोच समझकर’ पावले उचलावी लागणार आहेत ही चर्चेची दुसरी बाजू आहे.

A. T. Nana Patil, Karan Pawar
Loksabha Election 2024 : मतदानासाठी शाईचा महापुरवठा ; ‘म्हैसूर पेंट्स व व्हार्निश’ कंपनीला काम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com