Satara Loksabha Constituency : सातारा लोकसभेची जागा सोडणार नाही ; शरद पवार

सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत निर्णय झाला आहे.
Satara Loksabha Constituency
Satara Loksabha Constituencysakal
Updated on: 

पुणे : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत निर्णय झाला आहे. त्यानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीच आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेससाठी सोडणार नाही.

सातारा आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील आमचे उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ५) पुण्यात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असतील तर, त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीतील उमेदवार मित्र पक्षांना विचारात न घेताच जाहीर केला, परंतु यात आता बदल होईल, असे वाटत नाही. भिवंडीचा उमेदवारही आम्ही इतरांशी चर्चा करून ठरवला असल्याचे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara 17-year-old girl death case
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
shambhuraj desai, cm devendra fadnavis and eknath shinde
Satara DCC Bank Election 2026 Nomination Forms From September 25 Voting On November 1 And Counting On November 3
Marathi News Esakal
www.esakal.com