Jalgaon Election Analysis : सरकारविरोधी वातावरणात भाजपचा ‘बुरुज’ चिरेबंद

Election Analysis : लोकसभा निवडणुकीत किमान महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकारविरोधात वातावरण आहे, अशी स्थिती होती.
Smita Wagh, Karan Pawar, Raksha Khadse, Shriram Patil
Smita Wagh, Karan Pawar, Raksha Khadse, Shriram Patilesakal

Jalgaon Election Analysis : महाराष्ट्रातील निकालाचे एकूणच परिणाम भाजपसह महायुतीविरोधात असताना, जळगाव जिल्ह्यात मिळालेल्या यशाने भाजपने आपला चिरेबंद बुरुज कायम राखला, तर राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असतानाही त्याचा लाभ रावेरमध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व जळगावात शिवसेनेला (उबाठा) उचलता आला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत किमान महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकारविरोधात वातावरण आहे, अशी स्थिती होती. ()

राज्यात गेल्या दोन वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस, अशा दोन पक्षांची शकले उडून चार पक्ष झालेत. हे राजकारण जनतेला आवडले नाही. कापूस, कांदा, सोयाबीन आदी पिकांचे प्रश्‍न आणि मराठा आंदोलन या आव्हानात्मक आणि केंद्रातील दहा वर्षांतील सरकारविरोधी जनमत (ॲन्टिइन्कम्बन्सी) यामुळे महायुतीसमोर महाविकास आघाडीचे मोठे आव्हान मानले जात होते.

परिणामही त्याच दिशेने

या सरकारविरोधी वातावरणावर लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी शिक्कामोर्तब केले. राज्यात बहुतांश भागात महायुतीला विशेषत: भाजपला मोठा फटका बसला. राज्यात ही स्थिती असताना, उत्तर महाराष्ट्रातही सर्व आठही जागांवर तुल्यबळ व चुरशीच्या लढती होऊन महायुतीला फटका बसेल, अशी स्थिती होती. उत्तर महाराष्ट्रातील निकाल त्याच दिशेने गेले. जळगाव जिल्हा वगळता धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीने गमावल्या.

जळगाव जिल्ह्याने लाज राखली

उत्तर महाराष्ट्रात गेल्या २०१४ व २०१९ या दोनही लोकसभा निवडणुकीत भाजप- महायुतीने निर्भेळ ८-० असे यश मिळविले होते. आता मात्र महायुतीला आठपैकी अवघ्या दोघा जागांवर (भाजप) समाधान मानावे लागले. त्या दोन्हीही जळगाव व रावेर या असल्याने जळगाव जिल्ह्याने महायुतीची उत्तर महाराष्ट्रात लाज राखली. (latest marathi news)

Smita Wagh, Karan Pawar, Raksha Khadse, Shriram Patil
Aurangabad Graduate Election Analysis : काम झाले मात्र, देखाव्यापुरतेच! भाजपला आत्मपरीक्षणाची गरज

चिरेबंद बुरुज कायम

विरोधी वातावरणात भाजपचा जळगाव जिल्ह्यातील चिरेबंद बुरुज कायम राहिला. अर्थात, त्यामागे पक्षाचे संघटनात्मक बळ, बूथ पातळीपर्यंतचे नियोजन, गिरीश महाजनांसह गुलाबराव पाटील, अनिल पाटील या मंत्र्यांचे पाठबळ आणि महायुतीच्या आमदारांचे प्रयत्न हे एकत्रित घटक कारणीभूत आहेत. रावेर मतदारसंघातील सहापैकी केवळ दोनच ठिकाणी भाजपचे आमदार असूनही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी ऐनवेळी भाजपत येण्याची भूमिका जाहीर करून रक्षा खडसेंच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले. त्याचाही परिणाम या निकालावर झाल्याचे म्हणता येईल.

...तर जळगावातही ‘धग’

सरकारविरोधी वातावरणाची धग राज्यभर पसरली. तीन- चार महिन्यांवर आता विधानसभा निवडणूक येऊन ठेपलीय. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा राखल्या असल्या, तरी राज्यातील ही ‘धग’ जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचायला व परिणाम दाखवायला वेळ लागणार नाही, हे भाजपश्रेष्ठींनी समजून घ्यायला हवे. त्यादृष्टीने आता संघटनात्मक व डावपेचात्मक बदलही करणे गरजेचे आहे.

‘उबाठा’ला आत्मचिंतनाची गरज

राज्यात सरकारविरोधी वातावरणाचा महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी लाभ उठविला. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांच्या बाबतीत मात्र मविआ सप्शेल अपयशी ठरली. जळगावात शिवसेने (उबाठा)कडे संघटनेसह नेत्यांमधील समन्वयाचा अभाव होता. बूथरचनाही सक्षम नव्हती. एकट्या उन्मेश पाटलांच्या भरवशावर लोकसभेचा मतदारसंघ ‘कव्हर’ होत नसतो, हे दिसून आले.

श्रीराम पाटलांना ‘प्रा.लि.’चा फटका

रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. काही केल्या, कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळवायची, म्हणून श्रीराम पाटलांचा आटापिटा सर्वांनीच पाहिला. पवारांच्या नावावर, विशिष्ट समाजाच्या मतांवर आणि एखाद्या खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या मास्तराच्या भरवशावर निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी पक्ष, कार्यकर्त्यांचे बळ लागते, हे पाटलांना माहीत नसावं. उद्योजक असल्याने निवडणुकीचे नियोजन प्रायव्हेट लिमिटेडसारखे केल्याचा फटका त्यांना बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात स्वत:ला श्रेष्ठ मानणारे नेतेही दोन्ही ठिकाणी कमी पडले.

Smita Wagh, Karan Pawar, Raksha Khadse, Shriram Patil
Market Committee Election Analysis : भाजपला अंतर्गत रस्सीखेच भोवली; आत्मपरीक्षणाची वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com