Jalgaon Lok Sabha Constituency : पक्षातरांतून उमेदवारीची जळगाव लोकसभेची परंपरा!

Jalgaon News : पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येत आहे.
A. T. Patil, Karan Pawar
A. T. Patil, Karan Pawar esakal

Jalgaon News : पक्षातंरातून जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्याची जणू काही परंपराच आहे. पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येत आहे. यापूर्वी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष असलेले ए. टी.पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. (Jalgaon Lok Sabha Constituency)

जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी खुली नाराजी व्यक्त केली आहे. त्याच नाराजीतून आता पक्षातरांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

खासदार उन्मेश पाटील व त्यांचे मित्र व भाजपचे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या प्रक्रिया मुंबईत सुरू आहेत. त्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. लवकरच त्यांचा प्रवेश होणार आहे. खासदार पाटील व करण पवार यांचे पक्षांतर झाल्यानंतर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत मिळाले आहेत.

करण पवार हे मुळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यांचे काका डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार व मंत्री आहेत. त्यांचे घराणेच राजकीय असल्याने त्यांची उमेदवारी प्रबळ ठरण्याची शक्यता आहे. या शिवाय पक्षाचे नाराज खासदार उन्मेश पाटील यांचेही त्यांना पाठबळ असणार आहे. त्यामुळे ते भाजपला जोरदार टक्कर देतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. (jalgaon political news)

A. T. Patil, Karan Pawar
Loksabha Election 2024 : पुणे, शिरूरमध्ये तिरंगी लढत ; ‘वंचित’कडून पुण्यात मोरे, शिरूरमध्ये बांदल

जळगाव लोकसभेत पक्षांतरातून उमेदवारी मिळण्याची परंपराच आहे. यापूर्वी सन २००८ मध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व पारोळा पालिकेचे नगराध्यक्ष ए. टी.पाटील यांना पक्षांतरातून उमेदवारी दिली. ए. टी.पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेची निवडणूकही लढले होते.

मात्र भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे उमेदवार गुरूमुख जगवानी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सन २००८ मध्ये लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या, त्यावेळी भाजपचे आमदार बी.एस. पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र त्यावेळी ए. टी. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

त्यांनी त्यावेळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार वसंतराव मोरे यांच्या विरूध्द विजय मिळवून ते खासदार झाले होते. पुढे सन २०१४ मध्येही भाजपने त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली व ते खासदार झाले. मात्र सन २०१९ मध्ये त्यांची उमेदवारी पक्षाने कापली.

A. T. Patil, Karan Pawar
Loksabha Election 2024 : ‘एसडीपीआय’चा काँग्रेसला पाठिंबा कसा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com